मुंबई : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वयाच्या 79 व्या वर्षीही अभिनयाचा डंका वाजवत आहेत. एकीकडे ते एकावर एक चित्रपट करत असताना दुसरीकडे ते प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक करत आहे. अमिताभ बच्चन यांनी 2021 मध्येच 31 कोटी रुपयांचे घर खरेदी केलं होतं आणि आता त्यांनी मुंबईच्या उच्चभ्रू भागात संपूर्ण मजला विकत घेतला आहे. (Amitabh Bachchan New Propety)


आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ETimes च्या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील फोर बंगला परिसरातील पार्थेनॉन बिल्डिंगच्या 31व्या मजल्यावर 12 हजार स्क्वेअर फुटाचं एक आलिशान घर खरेदी केलं आहे. अमिताभ यांनी ही जागा राहण्यासाठी नाही तर गुंतवणुकीसाठी खरेदी केली. मात्र या मजल्याची किंमत किती आहे आणि किती किमतीत हा करार झाला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. या घराची किंमत 9 -10 कोटी असल्याचे म्हटले जाते. (Amitabh Bachchan Crores Of Propety)  


आणखी वाचा : तरुणींना युवकांकडून गरम रॉडनं बेदम मारहाण, म्हणाले 'करत होत्या अश्लील...'


अमिताभ बच्चन सध्या जलसा बंगल्यात राहत आहेत. त्यांचा प्रतीक्षा नावाचा बंगलाही आहे. 2021 मध्ये 31 कोटींच्या घरामुळे अमिताभ बच्चन चर्चेत आले होते. त्यांनी 2020 मध्ये ते विकत घेतलं, परंतु 2021 मध्ये नोंदणी केली. वृत्तानुसार, अमिताभ यांनी यासाठी 62 लाख रुपये स्टॅंप ड्युटी म्हणून दिले होते. अमिताभ यांच्याकडे अब्जावधी रुपयांची मालमत्ता आहे. 2013 मध्ये देखील अमिताभ बच्चन यांनी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी जुहू येथील त्यांच्या 'जलसा' बंगल्याच्या मागे असलेला दुसरा बंगला विकत घेतला, ज्याची किंमत 50 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते.


आणखी वाचा : हत्तीनं लहान मुलीच्या डान्सची केली Mimicry, Video Viral



2021 मध्ये, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या जुहू येथील अम्मू आणि वत्स या बंगल्याचा तळमजला एसबीआय बँकेला भाड्याने दिला. अमिताभ यातूनही भरपूर पैसे कमावतात. याशिवाय अभिनेत्री क्रिती सेननला अंधेरीतील एक अपार्टमेंट भाड्याने दिलं होतं.


आणखी वाचा : बबीताला 'या' व्यक्तीनं विचारली एका रात्रीची किंमत, मुनमुनची प्रतिक्रिया तुम्हालाही करेल हैराण



आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी


चित्रपट, ब्रँड आणि 'कौन बनेगा करोडपती' मधून प्रचंड कमाई
पाच दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेले अमिताभ आजही बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. ते चित्रपटांपासून ब्रँड्स, एंडोर्समेंट आणि इतर गोष्टींपासून कोटींची कमाई करतो. एकीकडे त्यांच्याकडे अजूनही अनेक चित्रपटांच्या ऑफर आहेत, तर दुसरीकडे ते 'कौन बनेगा करोडपती 14' होस्ट करत आहे. अनेक वर्षांपासून 'कौन बनेगा करोडपती'चे सूत्रसंचालन करणारे अमिताभ या शोसाठी कोटींची फी देखील घेतात. अमिताभ नुकतेच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात दिसले होते. अलीकडेच त्यांनी त्याच्या 'ऊंचाई' चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. अमिताभ यांच्या हातात जवळपास 7 चित्रपट आहेत. यामध्ये 'गणपत', 'ऊंचाई', 'घूमर',  'Project K, 'बटरफ्लाय', 'द उमेश क्रॉनिकल्स' आणि 'गुडबाय' यांचा समावेश आहे.