मुंबई : अमिताभ बच्चन हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील खूप मोठं नाव आहे. बॉलिवूडमध्ये त्यांना बिग बी म्हटलं जातं. अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या करोडोंमध्ये आहे. अमिताभ बच्चन हे एकमेव कलाकार आहेत ज्यांचे चित्रपट आजही तितक्याच उत्साहाने बघितले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला खूप मेहनत आणि संघर्ष करून उंचीवर नेलं होतं आणि आज ते जे काही आहेत. ते स्वतःच्या बळावर आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत.


अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये सत्ता पे सत्ता, नमक हलाल, शोले, अल्ला रखा, शहेनशाह, कालिया, अमर अकबर अँथनी, सुहाग, कभी खुशी कभी गम इत्यादींचा समावेश आहे. अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याच्या अपडेट्समुळे मीडियाच्या मथळ्यात असतात.


ऐश्वर्या रायचा बेबी बंप फोटो व्हायरल
बच्चन कुटुंब हे बॉलीवूडचे असंच एक कुटुंब आहे जे सर्वांना माहित आहे. या कुटुंबातील जवळपास सर्वच लोक बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार राहिले आहेत. या कलाकारांमध्ये स्वतः अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या राय बच्चन आणि पत्नी जया बच्चन यांचा समावेश आहे. अमिताभ बच्चन यांचं कुटुंब रोजच चर्चेत असतं. आता नुकतंच अमिताभ बच्चन पुन्हा एकदा आजोबा होणार असल्याची बातमी समोर आली असून ऐश्वर्या राय पुन्हा एकदा मुलाला जन्म देणार असल्याची चर्चा सुरु आहे.
 
जेव्हा ऐश्वर्याने मुलगी आराध्याला जन्म दिला तेव्हा अमिताभ बच्चन पहिल्यांदाच आजोबा झाले. वास्तविक, सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या रायचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती प्रेग्नंट दिसत आहे आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे की ऐश्वर्या रॉय दुसऱ्यांदा मुलाला जन्म देऊ शकते. या फोटोमागे सत्य असलं तरी हा फोटो खूप जुना आहे.



ऐश्वर्या रायचा हा फोटो त्यावेळचा आहे जेव्हा ती आपली पहिली मुलगी आराध्याला जन्म देणार होती. ऐश्वर्या राय बद्दल अनेकदा अफवा पसरली की ती आई होणार आहे, परंतु अद्यापपर्यंत ऐश्वर्या रायकडून  या बातम्यांना कधी दुजोरा मिळाला नाही.