Amitabh Bachchan Coolie Accident: मराठी कुटूंबातील प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या अभिनयाने बॉलिवूड गाजवलं होतं. 80 दशतकात त्यांना ‘डस्की ब्यूटी’ म्हणून ओळखलं जायचं. पण स्मिता पाटील यांनी वयाच्या 31 व्या वर्षीच या जगाला अलविदा केलं. 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांचं निधन झालं. स्मिता पाटील आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं खास नातं होतं. कारण बॉलिवूडमध्ये गाजलेला ‘कुली’ हा चित्रपट सर्वांच्या लक्षात आहे. या चित्रपटासोबतच शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांना झालेल्या दुखापतीचीही जोरदार चर्चा झाली होती. तसेच हा अपघात घडण्यापूर्वी स्मिता पाटील यांना स्वप्न पडले होते त्यानंतर हा अपघात घडला, नेमकं काय आहे प्रकरण... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1982 मध्ये कुली चित्रपटाचे शूटिंग बंगळुरूमध्ये सुरु होते. त्यादरम्यान एकदा रात्री 2 वाजता अमिताभ यांना रिसेप्शनमधून फोन आला. त्यांनी सांगितले की, अभिनेत्री स्मिता पाटील यांना तुमच्याशी बोलायचे आहे. मी चरकलो कारण मी कधीही स्मिताशी इतक्या रात्री बोललो नव्हतो. मी फोन घेतल्यावर मला समोरुन स्मिता यांनी विचारले, तुमची तब्येत ठिक आहे ना? यावर मी हो असे उत्तर दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्यासोबत अपघात घडला. अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी नमक हलाल, शक्ती आणि गुलामी या सिनेमात काम केले आहे. 


वाचा : Whatsapp वर Hi पाठवा आणि मिळवा Metro चं तिकीट 


 त्यानंतर 'कुली' शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांसोबत एक मोठी दुर्घटना घडली. एका फायटिंग सीनमध्ये अभिनेता पुनीत इस्सरच्या एका ठोशामुळे अमिताभ यांच्या आतड्याला जबर मार बसला होता. त्यावेळी अमिताभ यांना त्यांना किती मार लागला आहे याची जाणीव झाली नाही. पण काही वेळाने जेव्हा अमिताभ यांच्या पोटात दुखायला लागले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमिताभ यांना त्यांच्या या अपघाताविषयी अगोदरच कोणीतरी कल्पना दिली होती ती व्यक्ती होती अभिनेत्री स्मिता पाटील. 26 जुलै 1982 रोजी बिग बी 'कुली' चित्रपटाच्या सेटवर गंभीर जखमी झाले होते. 2 ऑगस्ट 1982 रोजी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता.   


1983 मध्ये रिलीज झालेल्या कुली चित्रपटातील अॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेता पुनीत इस्सरने चुकून अमिताभ बच्चन यांच्या पोटात ठोसा मारला. या घटनेमुळे अमिताभ बच्चन यांच्या पोटाचे लहान आतडे फाटले, परिणामी अमिताभ बच्चन जवळपास 2 महिने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात जीवन-मरणाची लढाई लढत होते. मात्र, अमिताभ बच्चन यांच्यासोबत असेच काही घडणार आहे, याची पूर्वकल्पना अभिनेत्री स्मिता पाटील यांनी आधीच दिली होती.  


जेव्हा स्मिताने अपघातापूर्वी अमिताभला फोन केला होता


मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर ही गोष्ट 1982 सालची आहे. कुली चित्रपटाचे शुटिंग संपवून अमिताभ थकलेल्या हॉटेलमध्ये झोपले होते की त्यांना मध्यरात्री फोन आला. अमिताभ यांना रात्री अशाप्रकारे फोन येणेही आश्चर्यकारक होते. अभिनेत्याने फोन उचलला तेव्हा पलीकडून आवाज आला, 'नमस्कार अमिताभ जी, मी स्मिता पाटील बोलतोय, तुम्ही ठीक आहात ना?'. वास्तविक स्मिता पाटील यांना एक स्वप्न पडले होते, या स्वप्नात तिने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना अपघात होऊन खूप दुखापत झाल्याचे पाहिले होते.


अमिताभ यांनी स्मिताला धीर दिला आणि त्यानंतर…


अमिताभ यांनी स्मिता पाटील (smta patil) सर्व बाजूंनी बरी आणि निरोगी असल्याची ग्वाही दिल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी अमिताभ यांनी स्मिता यांच्या काळजीबद्दल आभार मानले आणि परत झोपी गेले. तर दुसऱ्याच दिवशी जेव्हा अमिताभ कुली चित्रपटाच्या शूटिंगसाठी पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत असा अपघात झाला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.