मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चाहत्यांसह संपूर्ण कलाविश्वात चिंता व्यक्त जात होती. याच दरम्यान आता यांच्या तब्येतीबाबत अफवा पसरली आहे. बिग बी कोरोनातून बरे झाले असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याची चर्चा काही वेळापासून सुरु होती. मात्र बिग बींनी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची बाब चुकीची, खोटी असल्याचं सांगत, या अफवांवर पडदा टाकला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बींनी एक व्हिडिओ क्लिप शेअर करत, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची बाब पूर्णपणे खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. 



गेल्या काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर ऐश्वर्या राय-बच्चन आणि आराध्या बच्चन यांचीदेखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. काही दिवासांनी ऐश्वर्या आणि आराध्या यांनादेखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


बिग बींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर, चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. कलाविश्वातूनही अनेक सेलिब्रिटींनी बिग बीं लवकरात लवकर कोरोनामुक्त होण्यासाठी प्रार्थना केली होती. देशभरातून बिग बींच्या उत्तम स्वास्थ्यासाठी प्रार्थना, पूजा करण्यात येत होती. बिग बींनीही चाहत्यांनी केलेल्या या प्रेमासाठी त्यांचे आभारही मानले होते.