मुंबई : बॉलिवूडचा शहशांह अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वी अचानक रूग्णालयात दाखल करण्यात आलं. 10 ऑक्टोबर रोजी बिग बींचा वाढदिवस झाला आणि त्यानंतरच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे कलाकार आणि चाहते नाराज झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं की, बिग बींना अचानक असं काय झालं? त्यांना का रूग्णालयात दाखल करण्यात आलं? पण आता चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे अमिताभ बच्चन यांना रूग्णालयातून सोडण्यात आलं आहे. 



अमिताभ बच्चन यांना मंगळवारी मध्यरात्री मुंबईच्या नानावटी रूग्णालयात गुपचूप भर्ती करण्यात आलं. त्यांना नेमकं का रूग्णालयात दाखल करण्यात आलं हा प्रश्न सगळ्यांना पडला. शुक्रवारी रात्री 9 वाजता त्यांना डिस्चार्ज मिळाला. त्यांना आणण्यासाठी जया बच्चन आणि अभिषेक बच्चन दोघंही गेले होते.  


अमिताभ बच्चन यांना लिवरशी संबंधीत त्रास आहे. त्यामुळे 3 दिवस त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रकृतीची माहिती चाहत्यांना स्वतः दिली आहे. त्यांनी म्हटलं की, 'कृपया प्रोफेशनल नियम-कायदे लक्षात ठेवा. आजारपण आणि उपचार हे एखाद्या व्यक्तीची खासगी गोष्ट आहे. याचा व्यावसायिक फायदा घेणं गुन्हा आहे. कृपया हे समजून घ्या आणि याचा सन्मान करा.' अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर ही पोस्ट शेअर केली आहे.