मुंबई : बॉलिवूडचे कलाकार फीट राहण्यासाठी अधिक काळजी घेताना दिसतात. प्रत्येक सेलिब्रिटी स्वत:ला फीट ठेवण्यासाठी स्पेशल डाएट प्लान फॉलो करतात. बॉलिवूडचे दिग्गज महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे देखील याबाबतीत मागे नाहीत. 80 वर्षांचे अमिताभ बच्चन यांचा डाएट (Amitabh Bachchan Diet) प्लान त्यांना फीट ठेवतो. अमिताभ बच्चन यांना लिव्हर सिरोसिस नावाचा आजार देखील आहे. शिवाय त्यांना ऑटोइम्यून डिसीज नावाचा आजारही आहे. पण या सर्व आजारांवर मात करत बिग बी (Big B) एकदम फिट दिसतात. (fitness and diet secrets of Amitabh Bachchan)


अमिताभ बच्चन यांचा हेल्दी डाएट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन न्याहारीनंतर (Amitabh bachchan breakfast) नारळ पाणी, आवळा, खजूर, तुळशीची पाने आणि बदाम यांचा आहारात समावेश करतात. हायड्रेटेड राहण्यासाठी अमिताभ बच्चन भरपूर प्रमाणात पाणी पितात. याचा खुलासा त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये केला आहे.


बीग बी घेतात हलके अन्न


अमिताभ बच्चन आहारात (Amitabh Bachchan food) हलके पदार्थ खातात. अमिताभ बच्चन यांच्या जेवणात तिखट गोष्टी नसतात. त्यांच्या आहारात मुख्यतः भाज्यांचा सूप आणि पनीर भुर्जीचा समावेश असतो. अमिताभ देखील भात खात नाहीत. तसेच ते मिठाई खाणेही टाळतात.


अमिताभ चहा-कॉफीपासून दूर


महानायक अमिताभ बच्चन हे चहा-कॉफीपासून दूर राहतात. पण ते लिंबूपाणी घेतात. कोणतेही ड्रिंक्स ते घेत नाहीत.


अमिताभ करतात नियमित व्यायाम


अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan workout) यांच्या दिवसाची सुरुवात योगापासून होते. ते रोज सकाळी योगा आणि वर्कआउट करतात. याबाबत ते कंटाळा करत नाहीत.