बसमधील डान्समुळं चमकलं नशीब, अभिनेत्याला मिळाला असा चित्रपट की 20 वर्षांपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड
Trending News: बसमधील एक डान्स आणि एक चित्रपट मिळाला. या चित्रपटाचा 20 वर्षापर्यंत कोणीच रेकॉर्ड मोडू शकलं नाही.
Trending News: सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी चित्रपट सात हिंदुस्तानीमधून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. मात्र, हा चित्रपट त्यांच्या करिअरमधील सर्वात फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्यांनी रेश्मा और शेरा या चित्रपटात काम केले होते. या सिनेमात त्यांनी मूकबधिराची भूमिका साकारली होती हा चित्रपटही फ्लॉप ठरला होता. मात्र, 1971 साली आलेल्या आनंद चित्रपटाने मात्र त्यांचं करिअर सावरलं. मात्र त्यानंतरही आलेल्या त्यांच्या डझनभर चित्रपट फ्लॉप ठरले.
1975 साली आलेल्या ब्लॉकब्लास्टर चित्रपट शोलेमध्ये अमिताभ बच्चन यांनी अभिनय केला होता. मात्र ही भूमिका त्यांना बॉम्बे टू गोवा चित्रपटानंतर मिळाली होती. शोलेमध्ये धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया भादुरी, संजीव कुमार, जगदीप, असरानी, सचिन पिळगावकर, एके हंगल, हेलन आणि अमजर खान यांच्यासारखे दिग्गज कलाकार दिसले होते. रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेल्या शोलेने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. वर्षांनुवर्ष कोणताच चित्रपट याचा रेकॉर्ड तोडू शकलं नाही.
रमेश सिप्पी आणि हेमा मालिनी एकदा अमिताभा बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमादरम्यान रमेश सिप्पी यांनी बिग बींना चित्रपटात कसं घेतलं यामागचा किस्सा सांगितला आहे. रमेश सिप्पी यांनी जय आणि वीरु या जोडीला सिनेमात कसं कास्ट केलं, हे सांगितलं. ते म्हणाले की, सलीम-जावेद यांनी मला म्हटलं की अमितजींना चित्रपटात घेऊन बघा. जंजीरमध्ये त्यांनी खूप छान काम केलं होतं. तसंच, बॉम्बे टू गोवामध्ये त्यांनी बसमध्ये जबरदस्ती डान्सदेखील केला होता. त्याच आधारावर त्यांना शोलेमध्ये कास्ट करण्यात आलं.
1975 साली आलेल्या शोले चित्रपटाचा 20 वर्षांपर्यंत कोणीच रेकॉर्ड तोडू शकलं नाही. स्वतः निर्मात्यांनाही अपेक्षा नव्हती की चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई करु शकेल. सुरुवातीला चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र जेव्हा चित्रपटाची लोकप्रियता वाढली तेव्हा शोलेने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले. चित्रपटाने तेव्हा 35 कोटींची कमाई केली होती.
तीन कोटी रुपयांत बनवलेला चित्रपटाने 35 कोटींपर्यंतची कमाई केली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, अमजद खान, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमारसह अनेक दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारली होती.