मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन सध्या आपल्या 'झुंड' सिनेमामुळे चर्चेत आहेत. वयाच्या ७९ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांचा फिटनेस सगळ्यांनाच चकीत करणारा आहे. अमिताभ बच्चन या सिनेमात फुटबॉलच्या कोचची भूमिका साकारत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन यांच्या मेहनतीचं फळ या सिनेमात पाहायला मिळत आहे. बिग बी कायमच सगळ्या गोष्टीत बारकाईने लक्ष देतात. असंच लक्ष त्यांनी आपल्या 'जलसा' बंगल्यामध्ये दिलं आहे. 


या घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईने निवडली आहे सध्या सोशल मीडियावर त्यांच्या घरातील एका बैलाचं पेन्टिंग असलेला फोटो व्हायरल होतं आहे.


वास्तूनुसार घरामध्ये बैल पेंटिंग लावण्याचे हे फायदे आहेत.



वास्तूनुसार, घरात फक्त पांढरा बैल पेंटिंग लावावा कारण पांढरा रंग शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे आणि सकारात्मक गोष्टींना आकर्षित करतो.
- बैल कला शक्ती, गती, वर्चस्व, आशा आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करतो.
- अशी पेंटिंग ऑफिस किंवा घराच्या कोपऱ्यात ठेवल्यास आर्थिक स्थितीत गती येण्यास मदत होते.
- बैल हा शक्ती आणि प्रगतीचं प्रतिक आहे.
- जीवनात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
- धावणारा बैल जीवनातील गती आणि वाढ दर्शवतो.
- बैलाचं पेंटिंग लावल्याने व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंवर सकारात्मक परिणाम होतो.
- घराच्या किंवा ऑफिसच्या दक्षिणेकडील भिंतीवर बुल पेंटिंग लावावे कारण ही दिशा यश आणि कीर्तीशी संबंधित आहे.


सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांच्या घरातील एका बैलाचं पेन्टिंग असलेला फोटो व्हायरल होत आहे, ज्याची किंमत जवळपास ४ कोटी रुपये आहे.