VD 14: साउथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेचा विषय बनला आहे. विजयने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:साठी वेगळेच स्थान मिळवले आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. सध्या तो ‘वीडी 12’ या चित्रपटावर काम करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय, विजयकडे आणखी दोन प्रोजेक्ट्स आहेत, त्यापैकी एकाचे दिग्दर्शन राहुल सांकृत्यायन करत आहेत. अलीकडेच या चित्रपटाच्या सेटवर मुहूर्त पूजा पार पडली. आता या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची आणि रंजक बातमी समोर आली आहे.


अमिताभ बच्चनसोबत विजय देवरकोंडा दिसणार?


‘वीडी 14’ या चित्रपटात अमिताभ बच्चन एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारतील असे सांगितले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अमिताभ बच्चन विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील. पण निर्मात्यांकडून अद्याप याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी दक्षिणात्य अभिनेता प्रभाससोबत 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात काम केले होते.


रश्मिका मंदाना विजयसोबत मुख्य भूमिकेत


या चित्रपटात विजय देवरकोंडासोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चाहते या दोघांना पुन्हा एकदा चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. जर बिग बी या प्रोजेक्टचा भाग बनले, तर हा चित्रपट आणखी लक्षवेधी ठरेल, असे म्हणता येईल.


चाहत्यांचा उत्साह


‘वीडी 14’ हा एक मोठा प्रोजेक्ट असून हा चित्रपट मैत्री मूव्ही मेकर्सच्या निदर्शनात तयार होणार आहे. या चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारी 2025 मध्ये सुरू होणार आहे. पहिल्या शेड्यूलमध्ये विजय देवरकोंडाच्या इंट्रोडक्शन सीन्सचे शूटिंग केले जाणार आहे. चित्रपटाच्या सेटवरील विजयच्या लुकबाबतही चाहत्यांमध्ये चर्चा रंगल्या आहेत.


हे ही वाचा: वाईट सवयींमुळे करिअर संपुष्टात, 19 वर्षांनंतर पत्नीने दिला घटस्फोट, सचिनसोबत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?


जर अमिताभ बच्चन 'वीडी 14' चित्रपटात दमदार अभिनय करताना दिसले तर नक्कीच हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास अनुभव ठरेल. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाची केमिस्ट्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता तर वाढलीच आहे. पण, बिग बी या चित्रपटात दिसतील या बातमीनेच अमिताभच्या चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. प्रदर्शनापुर्वीच धुमाकुळ घालणाऱ्या या चित्रपटाला प्रक्षक रिलीज झाल्यावर कसा प्रतिसाद देतिल हे पाहणे औत्सुक्याचे आसेल.