क्रिप्टोकरन्सीमध्ये देखील `शहंशाह` ठरले Amitabh Bachchan, एका वर्षात कसे बनले करोडपती?
अमिताभ बच्चन यांच्या यशामागे क्रिप्टोकरन्सीचा देखील मोठा वाटा
मुंबई : बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेता आहेत. मात्र अमिताभ बच्चन आपल्या अभिनयासोबतच वेगवेगळ्या माध्यमातून पैसा कमावत असतात. अमिताभ बच्चन देखील क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करतात. गेल्यावर्षी त्यांनी क्रिप्टोकरन्सीमधून बक्कळ पैसा कमावलाय.
बजेट- 2022 पासून क्रिप्टोकरन्सी खूप चर्चेत आल्या आहेत. कारण देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प-2022 मध्ये क्रिप्टोबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्याने क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या कमाईवर 30 टक्के कर भरण्याचे सांगितले आहे. तेव्हापासून त्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
बिग बी यांनी क्रिप्टोमधून करोडो रुपये कमावले
30 टक्के टॅक्स भरण्याच्या नियमानंतर मेगास्टार अमिताभ बच्चन क्रिप्टोकरन्सीमधून पैसे कमवतात अशी चर्चाही समोर आली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी सिंगापूरच्या एका कंपनीत 1.6 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मेरिडियन टेक नावाच्या या कंपनीत गुंतवणूक करून अमिताभ बच्चन यांना अडीच वर्षांत सुमारे 1.12 अब्ज रुपयांचा परतावा मिळाला.
अनेक ठिकाणी केली गुंतवणूक
बिग बी केवळ क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून पैसे कमवतात असे नाही. पण त्यांच्या नफ्याचे हेही एक मोठे कारण आहे. रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी अनेक ठिकाणी आपले पैसे गुंतवले आहेत.
कमावण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
अमिताभ बच्चन यांना जस्ट डायलमधून १०.२% रिटर्न मिळाले आहे. त्यांनी गेल्या चार महिन्यापूर्वी ६.२७% मिलियन गुंतवणूक केली. त्यामधून त्यांनी ७० मिलियन नफा मिळवला.