मुंबई : जोधपूर येथे शूटिंगवेळी त्यांची तब्येत बिघडली असून मुंबईतील डॉक्टरांची टीम जोधपूरमध्ये पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन हे जोधपूरमध्ये ‘ठग्स ऑफ हिंदुस्थान’ या सिनेमाचं शूटिंग करत होते. अचानक त्यांची सेट्वर तब्येत बिघडली आणि सेटवर कोसळले. मात्र त्यांना नेमकं काय झालं हे कळू शकलेलं नाहीये.


चार्टर्ड प्लेनने मुंबईहून डॉक्टरांची टीम जोधपूरमध्ये पाठवण्यात आली असून तातडीने त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांची तब्येत बिघडल्याचा उल्लेख त्यांनी स्वत: त्यांच्या ब्लॉगमध्ये केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘माझी डॉक्टरांची टीम सकाळी पोहोचणार आहे. मी आराम करणार आणि याबाबत माहिती देत राहणार’. 



'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चं शूटिंग जोधपूर येथे सुरू आहे. तर प्रचंड उन्हात सलग शूटिंग केल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं. आठवडाभरापासून अमिताभ जोधपूरमध्ये असून तब्येत बिघडल्याने कालपासून त्यांनी शूटिंगमध्ये भाग घेतला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, अमिताभ यांना मुंबईत हलविण्यात येणार आहे.