मुंबई : प्रेक्षकांना ‘कौन बनेगा करोडपती’च्या १४ व्या सिझनची उत्सुकता लागलेली असतानाच बॉलीवूडचे महानायक एका आगळ्या वेगळ्या लूकमध्ये दिसत आहेत. वयाची ८० वर्षे पुर्ण करूनही आजही ते तितकेच तरूण दिसतात. आपल्या सोशल मीडियावर ते सक्रिय असतात आणि त्यांच्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या कौतुकाचा वर्षाव होत असतो. नुकतेच ते एका गुजराती चित्रपटाच्या पोस्टरमधून वेगळ्या लूकमध्ये दिसत असून त्यांचा हा नवा लुक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘फक्त महिलांओं माटे’ असे या गुजराती चित्रपटाचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांचा हा नवा लूक पाहून चाहत्यांना धक्का बसत आहे. कारण त्यात अमिताभ बच्चन हे अगदी विशीच्या आसपासचे तरूण वाटत आहेत. त्यांनी जीन्स आणि पांढरा चेक्सचा शर्ट घातला आहे. नेटकरी त्यांच्या या नव्या लूकवर फिदा झाले असून त्यांच्या या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये कमालीची पहायला मिळतेय. काहींनी त्यांच्या या नव्या चित्रपटावर नाराजीही व्यक्त केली आहे. त्यांच्या या पोस्टरवर बॉयकॉट बॉलवूडचा नाराही लावला आहे. तरीही... आपल्या पोस्टरबद्दल बीग बी यांनी अद्यापही कुठेच जाहीर वाच्यता केली नाही. त्यांचे हे पोस्टर ट्रेण्ड विश्लेषक तरण आदर्श यांनी पोस्ट केलं आहे. 


गुजराती अभिनेता यश सोनी या चित्रपटातून महत्त्वाची भूमिका साकारत आहे.  आणि त्याच्या बाजूलाच अभिताभ बच्चन यांचा फोटो आहे. ज्यात अभिताभ बच्चनदेखील हुबेहुब त्याच्याच वयाचे दिसत आहेत. या लूकमध्ये त्यांनी दाढी आणि चष्म्याचा त्यांचा नेहमीचा लूक तोच ठेवला आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात बीग बी एक स्पेशल गेस्ट म्हणून दिसणार आहेत. त्यामुळे अमिताभ यांचे चाहते या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहेत.



‘फक्त महिलांओं माटे’ या चित्रपटाचे दिग्दर्शक जय बोडस यांनी केलं आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि जन्नॉक फिल्म्स यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची निर्मिते आनंद पंडित आणि वैशाल शहा आहेत. ‘फक्त महिलांओं माटे’ हा चित्रपट १९ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.