मुंबई : लहानपणीच्या फोटोंचं आकर्षण प्रत्येकाला असतं. एक जरी लहानपणीचा फोटोसमोर आला, तर आपण देखील फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतो. सेलिब्रिटींबाबत देखील असंच आहे. सोशल मीडियाची क्रेझ असल्यामुळे सेलिब्रिटींचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. आपला आवडता सेलिब्रिटी लहान असताना कसा दिसत होता,  याची उत्सुकता चाहत्याच्या मनात शिगेला पोहोचलेली असते. आता देखील एका सेलिब्रिटीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आज बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बींचं चित्रपटसृष्टीत फार मोलाचं योगदान आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आणि सतत चित्रपटसृष्टीत सक्रिय राहिल्यामुळे त्यांचे फॅन फॉलोइंग देशातच नाही तर इतर राष्ट्रांमध्येही आहेत. जगभरातील लोक बिग बींना वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. 


सध्या अमिताभ बच्चन यांचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांच्यासोबत बॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार दिसत आहे. फोटोमध्ये तुम्ही बिग बींना ओळखलं असले, पण त्यांच्या शेजारी बसलेल्या बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या दुसऱ्या स्टारला ओळखलं नसेल. 



तुम्हाला वाटलं असेल, की बिग बींसोबत असलेला चिमुरडा अभिनेता अभिषेक बच्चन असेल. पण फोटोत दिसणार चिमुरडा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता हृतिक रोशन आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


हृतिक रोशनच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय हृतिक अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबत 'फायटर' सिनेमात देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.