मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशाची पहिल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या ही 73 वर गेली आहे. मुंबई-पुण्यातही कोरोनाचे 12 रूग्ण आढळले आहे. संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान मांडल आहे. याच दरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची दहशत असली तरीही तो बरा होऊ शकतो. याचं उदाहरण देखील समोर आलं आहे. भारतात कोरोनाची लागण झालेला पहिला रूग्ण एकदम ठणठणीत बरा झाला आहे. त्यामुळे हा साथिचा रोग बरा होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचं अमिताभ बच्चन यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. 


अमिताभ बच्चन या व्हिडिओत सांगतात की, कोरोनामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. याला न घाबरता आपण विश्वासाने सामना करायला हवा. याकरता त्यांनी काही ओळी लिहिल्या आहेत. याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट शेअर केल्या आहेत. 



अमिताभ बच्चन यांच्या ओळी हिंदीत 


''बहुत इलाज बताते हैं जन-जनमानस सब. किसकी सुनें किसकी नहीं कौन बताए अब. कोई कहता है कलौंजी पीसो कोई कहता है आंवला रस. कोई कहता है घर में बैठो हिलो न टस से मस. ईर कहते हैं और बीर कहते हैं ऐसा कुछ भी करो न. बिना साबुन हाथ न धोएं और किसी को छुएं न. हमने कहा कि चलो हम ही कर देते हैं जैसा बोल रहे हैं सब. आने दो कोरोना-वोरोना ठेंगा दिखाओ तब.''


या व्हिडिओत त्यांनी म्हटलंय,'खूप लोक या कोरोनावर उपचार सांगत आहेत. कुणाचं ऐकायचं हे मात्र कोण सांगेल. कुणी म्हणतं दुधी किसून घ्या तर कुणी म्हणत आवळा रस प्या. तर कुणी म्हणतं फक्त घरी बसा इकडे-तिकडे हलू पण नका. कुणी सांगतं असं काहीसं करा. साबणाशिवाय हाथ धुवू नका. कुणाला स्पर्श करू नका. मी म्हटलं, चला मी पण करतो हे सगळं. येऊ दे कोरोना-वोरोना ठेंगा दाखवू' असा या पक्तींचा भावार्थ आहे. 



कोरोना व्हायरसमुळे दिल्लीत शाळा आणि सिनेमाघर 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. या अगोदर केरळ आणि जम्मूमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायसमुळे देशाचा पहिला बळी कर्नाटकमध्ये गेला आहे. आतापर्यंत 73 लोकांची टेस्ट पॉझिटीव आली आहे. यामध्ये 56 भारतीय आणि 17 विदेशी नागरिक आहेत.