मुंबई : संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावते’ सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांसोबतच बॉलिवूड कलाकार अवाक झाले. त्यात अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महानायक अमिताभ बच्चन यांनी या सिनेमाचा ट्रेलर पाहून सोशल मीडियात प्रतिक्रिया दिली आहे.  'पद्मावती'चा ट्रेलर पाहून अमिताभ यांनी एक ट्विट केलं आहे. 'त्याला हे कसं काय जमतं?... संजय लीला भन्साळी. पद्मावती आणि ट्रेलर! या माणसाला विलक्षण दृष्टीचं वरदानच मिळालंय.' असं अमिताभ यांनी म्हटलं आहे.


महाराणी 'पद्मिनी' यांच्या जीवनावर आधारित 'पद्मावती' येत्या १ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. सध्याची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोननं यात राणी पद्मिनीची भूमिका साकारली आहे. शाहीद कपूर राजा रतनसिंहच्या भूमिकेत असून रणवीर कपूरनं अल्लाउद्दीन खिलजी हा क्रूर शासक पडद्यावर जिवंत केला आहे.