मुंबई : फेब्रुवारी हा महिना प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. १४ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात व्हेलांटाईन डे साजरा केला जातो. आणि म्हणूनच व्हेलंटाईन महिन्यात आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड कपलबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी एकमेकांवर जिवापाड प्रेम केलं पण  तरीही हे कपल्स कधीच एकमेकांचे होऊ शकले नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन-रेखा
'ये कहां आ गए हम....यूं ही साथ साथ चलते' अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी एकमेकांचा हाथ धरला होता खरा पण तरीदेखील कलाकारांचे रस्ते मात्र वेग-वेगळे झाले. अमिताभ आणि रेखा यांचं प्रेम आजदेखील लोकांच्या मनात आहे. आणि हे तो पर्यंत चालू रहाणार जो पर्यंत हिंदी सिनेमा आहे.


अक्षय कुमार-रविना टंडन
एकवेळ अशी होती जेव्हा अक्षय कुमार आणि रविना टंडनच्या प्रेमाच्या चर्चा जोरदार होत्या. सिनेमाच्या शूटींगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या जवळ आले होते आणि ही गोष्ट लग्नापर्यंत पोहचली होती. दोघांचा साखरपुडादेखील झाला होता. मात्र हे नातं तुटलं. जेव्हा-जेव्हा बॉलिवूडमधील लव्हस्टोरीचा विषय निघतो तेव्हा-तेव्हा या जोडीचं नाव सर्वात आधी घेतलं जातं.


 ऐश्वर्या राय आणि सलमान खान
'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवरच ऐश्वर्या राय आणि सलमान खानमध्ये  'आंखों की गुस्ताखियां' सुरु झाली होती. आणि हळूहळू ही गोष्ट वाढू लागली. एकवेळ आली जेव्हा या दोघांचं प्रेम जगजाहिर झालं मात्र ज्याप्रकारे या दोघांच्या प्रेमाच्या बातम्या जगभर पसरु लागल्या तेव्हापासूनच या दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनीदेखील धुमाकूळ घातला.


शाहिद कपूर-करिना कपूर
व्हेलंटाईनची गोष्ट सुरुये आणि यात शाहिद आणि करिनाचं नाव नाही आलं तर हे कसं होईल. शाहिद आणि करिनाने एकमेकांना 4 ते 5 वर्षांपर्यंत डेट केलं आहे. दोघं एकमेकांवर जिवापाड प्रेम करायचे. नंतर माहित नाही अचानक काय झालं की, दोघांचे रस्ते कायमचे वेगळे झाले. आणि आजपर्यंत हे दोघं कधीच एकमेकांसोबत दिसले नाही.


रणबीर कपूर-दीपिका पदूकोण
रणबीर कपूरच्या मागे वेडी असलेली बॉलिवूडची मस्तानी पण रणवीरच्या मनात होती कोणी दुसरीच या नात्याला दृष्ट लागली आणि हे नातं कायमसाठी अधूरं राहिलं


रणबीर कपूर-कतरिना कैफ
जिच्यासाठी रणबीरने दीपिका पदुकोणला सोडलं ती होती कतरिना कैफ. अजब प्रेम की गजब कहानी दरम्यान दोघांमध्ये जवळिकता वाढली आणि त्यावेळी अभिनेता दीपिकासोबत रिलेशनशिपमध्ये होता. जेव्हा दीपिकाला या नात्याबद्दल समजलं तेव्हा ती खूप वाईट प्रकारे तुटली.