Amitabh Bachchan on The Archies: बॉलिवूडचे स्टारकीड्स डेब्यू करतात तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना जितका आनंद होतो तो आनंद इतर कोणालाच होत नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांची तिसरी पिढी आता नव्या चित्रपटातून पदार्पण करते आहे. हरिवंशराय बच्चन हे ख्यातनाम कवी होते. त्यांचे चिरंजीव अमिताभ बच्चन अर्थात सुपरस्टार, बिग बी, बॉलिवूड शहेनशहा; गेली 50 हून अधिक वर्षे बॉलिवूडवर अधिराज्य गाजवून आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता त्यांची पुढील म्हणजे तिसरी पिढी बॉलिवूड गाजवायला सज्ज झाली आहे. 2003 साली अभिषेक बच्चन यानं 'मैं प्रेम की दिवानी हूॅं' या चित्रपटातून बॉलिवूडमधून पदार्पण केले होते. त्याच्यासोबत करीना कपूर आणि हृतिक रोशन हे प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट प्रचंड गाजला. वीस वर्षांनंतर बिग बींचा नातू, श्वेता बच्चन नंदा यांचा मुलगा अगस्त्या नंदा हा 'द आर्चिज' या चित्रपटातून डेब्यू करतो आहे आणि तो या चित्रपटातून हिरोच्या म्हणजे आर्ची अॅन्ड्रुजच्या भुमिकेत आहे. 


यावेळी त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आजोबा अमिताभ बच्चन यांनी नातवाच्या डेब्यूच्या निमित्तानं एक खास पोस्ट लिहिली आहे. हा चित्रपट बरोबर महिन्याभरानं प्रदर्शित होतो आहे. ज्याचा ट्रेलर हा नुकताच प्रदर्शित झाला आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. आपल्या अनेक खास आठवणी आणि आगामी कामांबद्दल, चित्रपटांबद्दल ते इन्स्टाग्रामवर भरभरून लिहित असतात. त्यांनी 'द आर्चिज' या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकांऊटवरून शेअर केला आहे. त्यांनी आपल्या नातवाला खास शुभेच्छा दिल्या असून त्याच्यावर भरपूर विश्वासही दर्शवला आहे.


हेही वाचा : 'पंखा साफ करायची वेळ...'; नेटकऱ्याच्या या खोचक कमेंटवर मिताली मयेकरच्या नवऱ्याचं सडेतोड उत्तर


''अगस्त्या, माझ्या लाडक्या, तुला माझा खूप आशीर्वाद. मी तुझ्यासोबत आहे. अशाप्रकारे तू तुझी जळती मशाल ही पुढे घेत जा.'' यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या संपुर्ण कास्टलाही टॅग केलं आहे. नव्या नवेली नंदानं या पोस्टखाली रिएक्ट केलं आहे. बहीण नव्या नंदा आणि मामा अभिषेक बच्चन यांनीही अगस्त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट चालेल आणि अगस्त्याला भरपुर यश मिळेल याबाबत बिग बी आशावादी असल्याचे त्यांच्या या पोस्टवरून समजते आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित होतो आहे. सुहाना खान, अगस्त्या नंदा, खुशी कपूर, अदिती सिहेगल (डॉट), मिहिर अहुजा, वेदांग रैना, युवराज मेंदा अशी तगडी स्टारकास्ट यावेळी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाहता येणार आहे.