अमिताभ बच्चन यांच्या नातीनं जे ठरवलं ते मिळवलंच; अखेर तिला मिळाली नशिबाची साथ...
Amitabh Bachchan Grand Daughter Navya Naveli Nanda : नव्या नवेली नंदानं जे ठरवलं ते मिळवलंच...
Amitabh Bachchan Grand Daughter Navya Naveli Nanda : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा चर्चेत असणाऱ्या स्टारकिड्सपैकी एक आहे. नव्यानं अभिनय क्षेत्रात करिअर न करता दुसऱ्याच क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं. तिला तिच्या वडिलांप्रमाणे बिझनेसमॅन व्हायचं आहे. या सगळ्यात आता नव्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. तिचं म्हणणं आहे की तिचं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. नव्याचं स्वप्न होतं की तिनं देशातील टॉपच्या असलेल्या इंडियन इंस्टीट्यूटपैकी एक इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट अहमदाबादमध्ये अॅडिमशन घेण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न आता तिनं पूर्ण केलं आहे. चला तर जाणून घेऊया IIM मधून ते कोणता कोर्स करणार आहेत.
नव्या नवेली नंदानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून नव्यानं चाहत्यांना त्यांच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये अॅडिमशन झाल्याची बातमी दिली. फोटो शेअर करत नव्यानं कॅप्शन दिलं की 'स्वप्न पूर्ण होतात.' त्यासोबत नव्यानं सांगितलं की ती 2026 पर्यंत इथे तिचं पुढचं शिक्षण पूर्ण करणार आहे. तर हे सांगत नव्यानं लिहिलं की पुढची 2 वर्ष... सगळ्यात चांगली लोकं आणि फॅकल्टीसोबत होतील! 'ब्लेंडेड पोस्ट ग्रेजुएशन प्रोग्राम (BPGP MBA) असं तिच्या कोर्सचं नाव असल्याचं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
नव्यानं सोशल मीडियावर एक नाही तर अनेक फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती कॉलेजच्या गेटवर उभी राहून IIM च्या नावासोबत पोज देताना दिसत आहे. त्याशिवाय तिनं कॉलेजमधील काही फोटो शेअर करत कॅम्पसची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तर काही फोटोंमध्ये ती तिच्या फॅकल्टी आणि मित्र-मैत्रिणींसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, हे फोटो समोर येताच चाहत्यांनी तिला नवीन सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी नव्याला तिच्या कोर्सविषयी विचारलं की हा कोणता कोर्स आहे.
हेही वाचा : 'मी तुरुंगात असताना आई-वडील माझ्या मित्रमंडळींसोबत मद्यपान..', अभिनेत्रीचा मोठा खुलासा
नव्यानं शेअर केलेल्या या फोटोंवर करिश्मा कपूरनं कॅप्शन दिलं की शुभेच्छा आहेत. अनन्या पांडे, शनाया कपूर, झोया अख्तरनं देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तर असं असताना काही नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, चला काही तरी सर्वसामान्यांसारखं घडलं. दुसरा नेटकरी म्हणाला, BPGP या कोर्सविषयी कधीच ऐकलं नाही. त्याशिवाय अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.