Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. आजही त्यांचे लाखो चाहते आहेत आणि ते फक्त भारतात नाही तर परदेशातही आहेत. अमिताभ बच्चन हे दर रविवारी त्यांच घर 'जलसा' च्या बाहेर जातात आणि त्यांच्या चाहत्यांची भेट घेताक. बिग बींनी नाही तर पण त्यांच्या नातूनं त्यांच्या स्टारडमचा खूप फायदा घेतला आहे. अगस्त्य नंदानं अमिताभ यांच्या नावावर एक-दोन महिने नाही तर तब्बल 2 वर्ष फुकटात जेवण केलं आहे. अमिताभ बच्चननं स्वत: हा किस्सा सांगितला आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी हा किस्सा ‘कौन बनेगा करोडपति’ च्या सेटवर हा खुलासा केला आहे. हा खुलासा त्यांनी कार्तिक आर्यन आणि विद्या बालन यांच्या समोर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शुक्रवारी ‘कौन बनेगा करोडपति 16’ मध्ये विद्या बालन आणि कार्तिक आर्यन हे आगामी चित्रपट ‘भूल भुलैया 3’ चं प्रमोशन करताना दिसले. या एपिसोडमध्ये आवडीच्या खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर चर्चा सुरु झाली. तेव्हा अमिताभ हे विद्या आणि कार्तिक आर्यनला विचारताना दिसले की त्यांच्या कामामुळे त्यांना डायटिंगवर खूप लक्ष द्यावं लागतं. तर जेव्हा संधी मिळते तेव्हा त्यांना काय खायला आवडतं. त्यावर विद्या उत्तर देत म्हणाली, दही भात. जेव्हा मला माझ्या आत्म्याला शांत करायचं असतं तेव्हा मी दही भात खाते. 


तर स्ट्रीट फूडवर बोलताना विद्यानं सांगितलं की तिला चेंबूरच्या एका स्टॉलवरचा वडा पाव तिला खूप आवडतो. त्याविषयी सांगत विद्या म्हणाली, मी लहाणाची मोठी चेंबूरमध्ये झाली. तिथल्या पोस्ट ऑफिसकडे एक वडा-पावचा स्टॉल असायचा. सर, त्यांच्याविषयी विचार करतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. पुढे कार्तिक आर्यननं विषयी बोलायचं झालं तर तो स्वत: एक स्ट्रीट फूड चाहता आहे. त्यातही चायनीट स्टॉलचा त्यानं उल्लेख केला, जो जुहूमध्ये अमिताभ बच्चन यांच्या घराच्या जवळ आहे. कार्तिकनं सांगितलं की तो स्ट्रगल करत होता तेव्हापासून आतापर्यंत त्याच स्टॉलवर जाऊन जेवतो. कधी-कधी मध्यरात्री 2 वाजता देखील जातो. कार्तिक पुढे मस्करीत म्हणाला की त्यानं तिथे इतक्या वेळा खाल्लं आहे की त्या व्यक्तीनं एका डिशला त्याचं नाव देखील दिलं आहे. त्या डिशला 'कार्तिक स्पेशल' असं म्हणतात.  


हे सगळं ऐकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी नातू अगस्त्य संबंधीत एक किस्सा सांगितला. अमिताभ यांनी सांगितलं की 'न्यूयॉर्कमध्ये अभ्यास करत असताना, अगस्त्य हा नेहमीच त्याच्या जवळ असलेल्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये जायचा आणि त्याचं लक्ष अमिताभ बच्चन नावाच्या एका डिशवर गेले. आजोबाचं नाव पाहून त्याला खूप उत्सुकता झाली. अगस्त्यनं त्या डिशविषयी तिथल्या स्टाफला विचारलं. ती डिश खाल्ल्यानंतर, त्यानं त्या स्टाफला सांगितलं. तुम्हाला माहितीये का... ते माझे आजोबा आहेत. सुरुवातीला कोणालाच अगस्त्यवर विश्वास झाला नाही. त्यांना विश्वास व्हावा यासाठी अगस्त्यनं त्याच्या फोनमध्ये असलेला आमचा एक फोटो दाखवला आणि त्यानंतर तो फोटो पाहून त्यांना कळालं की हे खरं आहे. त्याचा पुढे असा परिणाम झाला की अगस्त्यला त्या रेस्टॉरंटमध्ये फुकटात जेवण मिळू लागलं. त्या रेस्टॉरंटमध्ये एक-दोन दिवस किंवा महिने नाही तर तब्बल 2 वर्ष त्यानं फुकटात जेवण केलं.' अमिताभ बच्चन यांनी सांगितलेलं ही गोष्ट ऐकताच कार्तिक आर्यन हसत म्हणाला, 'सर, मी जुहूमध्ये जेव्हा खायला जातो तेव्हा ते माझ्याकडून पूर्ण पैसे घेतात.' 


हेही वाचा : 'सलमान खानला काही व्हायला नको...'; बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर 'या' अभिनेत्याची चिंता वाढली


‘भूल भुलैया 3’ मध्ये विद्या आणि कार्तिक, मंजुलिका आणि रुह बाबा या भूमिकांमध्ये दिसणार आहे.