Photos : बिग बींनी शेअर केले नागराजच्या `झुंड` सिनेमाचे फोटो
पाहा सिनेमातील काही क्षण
मुंबई : 'सैराट' दिग्दर्शित नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सैराटच्या भरघोस यशानंतर नागराज आता हिंदीत पाऊल ठेवत आहे. महत्वाची बाब म्हणजे पहिल्याच प्रोजेक्टमध्ये नागराज मंजुळेने बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाच घेतलं आहे.
सैराटच्या घवघवीत यशानंतर नागराज मंजुळेने मराठीचा झेंडा अटकेपार नेला. बॉलिवूडलाच काय तर इतर भाषेतील सिनेमांना देखील या सिनेमाची दखल घ्यायला भाग पाडलं.
'झुंड' या बॉलिवूडच्या सिनेमाचं शुटिंग सुरू झालं आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बी नागराजसोबत नागपुरात दाखल झाले होते. याचे फोटो काही दिवसांपू्र्वी नागराज आणि बिग बी यांनी शेअर केले होते.
या सिनेमाची कथा उनाड मुलांना एकत्र करून त्यांची फुटबॉल टीम तयार करणाऱ्या प्रशिक्षकांवर आधारित आहे. अमिताभ बच्चन फुटबाॅल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत. या भूमिकेसाठी बिग बी यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
या फोटोत बिग बी एका घरात फुटबॉलची प्रॅक्टिस करताना दिसत आहेत. असं सांगितलं जातंय की, याच घरी बिग बी यांच्या 'झुंड'चं शुटिंग घरी सुरू आहे.
नागराज आणि महानायक अशी दोन अचाट व्यक्तिमत्व आपल्याला या सिनेमातून भेटणार आहे. एका व्यक्तीच्या दिग्दर्शनाने आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला वेडं बनवलं. तर अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने संपूर्ण देशाला वेडं लावलं आहे.
हे फोटो देखील 'झुंड' सिनेमातील असून बिग बी एका सामान्य घरात दिसत आहेत.
बिग बी यांचे सध्याचे सगळेच ट्विटरवरील फोटो बोलके आहेत. प्रेक्षकही त्यांच्या "झुंड' या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.