मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतंच अमिताभ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना स्वातंत्र्य दिवस, श्रावण सोमवार, संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, यावेळी त्यांनी एका हटके अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 


आणखी वाचा : बिग बींच्या एका चुकीमुळे Ranbir-Alia चं करिअर धोक्यात? जाणून घ्या प्रकरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या ट्वीटमध्ये अमिताभ यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराती एक फोटो शेअर केला आहे. विठ्ठल रुक्मिणी यांच्या मुर्तीला तिरंग्याच्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी चक्क मराठीत सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी दिलेल कॅप्शन चर्चेचा विषय ठरत आहे. श्रावण वद्य चतुर्थी, संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय रात्रौ ०९.४४), शुभ दिवस, श्रावणी सोमवार शिवपूजन - शिवामूठ-मुग, ७६ वा स्वातंत्र्य दिन(अमृत महोत्सव), पारसी बांधवांचा सण पतेती, श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवा निमित्त मंदिरातील आजचा राष्ट्रीय पोशाख तिरंगा, असे कॅप्शन दिले आहे. अमिताभ यांच हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. 


आणखी वाचा : आजोबांना काही विचारलं तर ते उत्तर देतील का? मुलांचा प्रश्न ऐकताच जिनिलिया, म्हणाली...



आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर


दरम्यान, अमिताभ एका दुसऱ्या कारणामुळेही चर्चेचा विषय ठरत आहेत आणि ती गोष्ट म्हणजे त्यांचा आगामी चित्रपट 'ब्रह्मास्त्र' आहे. अलीकडेच बिग बींच्या 'केबीसी' (KBC) शोमध्ये एक महिला स्पर्धक बसली होती आणि त्या महिलेनं पधर घेतला होताा. त्यावर अमिताभ यांनी प्रश्न उपस्थित केला पण बुरखा आणि हिजाबबाबत बोलले नाही. त्यानंतर नेटकऱ्यांनी अमिताभ यांना आणि त्यांच्या आगामी चित्रपटावर बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला. आता सोशल मीडियावर 'ब्रह्मास्त्र'वर बहिष्कार टाकण्याच्या मागणीचा चित्रपटाच्या कमाईवर काय परिणाम होतो, हे लवकरच कळेल. हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.


आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल


अमिताभ प्रभाससोबत ‘प्रोजेक्ट के’ असं त्या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विनच्या करत आहेत. या चित्रपटात दीपिकाही मुख्य भूमिकेत आहे. दीपिका पहिल्यांदाच प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे. प्रभास, दीपिका आणि बिग बी यांच्याशिवाय या चित्रपटात दिशा पटानी देखील आहे.