मुंबई  : आज बॉलिवूडचे शहेनशाह झालेले अमिताभ बच्चन मूळचे इलाहाबादचे !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीग बींचा हा 'इलाहाबादी' अंदाज पुन्हा रसिकांच्या भेटीला येणार आहे. बीग बींनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. 


सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह  


'गंगा किनारे वाला छोरा' अमिताभ बच्चन सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. काही दिवसांपूरवी त्यांनी ट्विटरवरून दूर जाण्याचे संकेत दिले आहेत. मात्र बीग बी त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग हमखास शेअर करतात. फोटो,व्हिडिओ हमखास शेअर केले जातात. बीग बी अवधी भाषेत बोलतानाचा खास व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. 


 



 


फेसबुकवर शेअर केला व्हिडिओ 


बीग बींनी फेसबुकवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये 'इलाहबादची अजून एक आठवण..' अशाप्रकारची कॅप्शन दिली आहे. हा व्हिडिओ एका अ‍ॅडचा भाग आहे. बीग बी यामध्ये अवधी भाषेत बोलताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना ही अजुन एक ट्रिट आहे.  


पंचाहत्तरीतही उत्साह कायम 


बीग बींनी यंदा पंचाहत्तरीत पदार्पण केलं आहे. मात्र अजुनही त्यांचा उत्साह कायम आहे. सध्या बीग बी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून परतले आहेत. सोबतच ऋषी कपूर कपूर यांच्यासोबत ते '102 नॉट आऊट'मध्ये दिसणार आहेत.