Amitabh Bachchan on Bollywood VS South : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढली आहे. त्यातही हिंदी भाषिक लोकांनाही दाक्षिणात्य चित्रपटांचे वेड लागले असं म्हणायला हरकत नाही. त्यात निर्मात्यांचे असे प्रयत्न असतात की लोकप्रिय असणाऱ्या किंवा चर्चेत असणाऱ्या कलाकारांचे चित्रपट हे पॅन इंडिया प्रदर्शित व्हायला हवे. या कारणामुळे बॉलिवूड वर्सेस दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा होऊ लागली. बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांविषयी अमिताभ बच्चन यांनी म्हटलं की मल्याळम आणि तमिळमध्ये खूप चांगले चित्रपट बनत आहेतं. मात्र, हे बोलणं चुकीचं असेल की दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ही बॉलिवूड चित्रपटसृष्टीपेक्षा चांगलं प्रदर्शन करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांनी पुण्यातील सिंबॉयसिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा केली. त्यांनी चित्रपटसृष्टीवर होण्याऱ्या टीकेसोबत चित्रपटामध्ये वापरण्यात येणाऱ्या टेक्निक्सचे फायदे आणि नुकसान सांगितले. अमिताभ यांच्यासोबत त्यावेळी त्यांची पत्नी आणि अभिनेत्री जया बच्चन देखील उपस्थित होत्या. 



बिग बींनी यावेळी म्हटलं की क्षेत्रीय चित्रपटसृष्टी खूप चांगलं काम करत आहे. मात्र, जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की 'ते त्याच प्रकारचे चित्रपट बनवत आहेत, जसे हिंदीत बनवण्यात येतात. ते फक्त ड्रेसिंग बदलतात, ज्यात ते सुंदर दिसतात. मी ज्या ज्या लोकांना भेटलो, त्यापैकी अनेकांनी सांगितलं की ते जुन्या चित्रपटांचे रिमेक बनवत आहेत. आमच्या प्रत्येक पटकथेत कुठे ना कुठे दीवार, शक्ति आणि शोले आहेत. मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये देखील चांगलं काम होतं आहे. हे सगळं फक्त बोटं दाखवण्यासाठी होतंय.'


पुढे अमिताभ बच्चन म्हणाले 'अनेकदा चित्रपटसृष्टीवर टीका आणि आरोपांचा सामना करावा लागतो. त्यामुळे देशातील नैतिकता बदलण्यास तुम्ही जबाबदार आहात. मला खात्री आहे की तुम्ही जयाला ओळखता, तिनं इन्स्टिट्यूट (FTII) मध्ये शिक्षण केलंय, या तथ्यांचे समर्थन करतील की पटकथा आणि चित्रपट हे समाज आणि रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या अनुभवांवर बनवण्यात येतात. तेच आमची प्रेरणा असते.'


हेही वाचा : काम मिळालं नाही तर काय करणार? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतोय, 'घर किंवा बूट विकून...'


अमिताभ यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर गेल्यावेळी ते ‘गणपत’ या चित्रपटांमध्ये दिसले होते. त्या चित्रपटात त्यांच्यासोबत टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. आता ते लवकरच ‘कल्कि 2898 एडी’ मध्ये दिसणा आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत दाक्षिणात्या सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पदुकोण दिसणार आहेत.