मुंबई : अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणा-या नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. या सिनेमाचं कथानक काय असणार? अमिताभ यांची भूमिका काय असणार? असे अनेक प्रश्न नागराज प्रेक्षकांना पडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता या सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचा खुलासा झाला आहे. नागराज मंजुळे यांच्या हिंदी सिनेमात अमिताभ बच्चन हे रिअल लाईफ कॅरेक्टर साकारताना बघायला मिळणार आहेत.


नागराज मंजुळे यांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा असून त्यांनी एक रिअल लाईफ स्टोरी या सिनेमासाठी निवडली आहे. अमिताभ बच्चन यात विजय बरसे या व्यक्तीची भूमिका साकारत असून तो नागपूरमध्ये एक एनजीओ चालवतो. ही एनजीओ गरीब मुलांसाठी फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करते.  


आपल्या बहुप्रतिक्षित प्रोजेक्टबद्दल नागराज यांनी सांगितले की, ‘या सिनेमाचं शुटिंग ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. हा सिनेमा एका रिअल लाईफ घटनेवर आधारित आहे. मात्र, सिनेमासाठी जे कथानक मी लिहिलंय, ते रिअल स्टोरीपेक्षा थोडं वेगळं आहे’. त्यांनी सांगितले की, या सिनेमासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. खूप रिसर्च केला आहे. स्क्रिप्टसाठी खूप वेळ हे मी गैर समजत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. याआधी ‘सैराट’ च्या स्क्रिप्टसाठी त्यांनी ८ वर्ष दिले, असेही ते म्हणाले. 


मी अमिताभ बच्चन यांना खूप मोठा फॅन आहे. ही भूमिका मी त्यांच्यासाठीच लिहिली आहे. त्यांना कॉपी करून, त्यांच्या ड्रेसिंग स्टाईलला कॉपी करत मी मोठा झालोय. ‘दीवार’ आणि ‘मजबूर’ या सिनेमात त्यांनी कमाल काम केलं आहे. मी शाळेत जाताना त्यांच्यासारखा शर्ट बांधून जात असे. अनेकदा माझ्या शिक्षकांनी ते निट केलंय. यासाठी अनेकदा मला शिक्षाही मिळाली. 


अमिताभ बच्चनचा भक्त -


नागराज मंजुळे हे स्वत:ला अमिताभ बच्चन यांना मोठा फॅन मानतात. त्यांनी सांगितलं की, ते जेव्हा पहिल्यांदा अमिताभ यांना भेटले तेव्हा त्यांनी स्वत:ला खूप कंट्रोल केलं. मला त्यावेळी बसल्या जागेवरच उड्या मारण्याचं मन होत होतं. जेव्हा या सिनेमाचं शुटिंग संपेल, तेव्हा मी त्यांना सांगणार आहे की, मी त्यांचा किती मोठा फॅन आहे’.