ऐश्वर्या-अभिषेकमधील दुराव्याच्या चर्चेदरम्यान, नवीन वर्षी अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय
बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन त्यांची सून ऐश्वर्या राय आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्यांच्या दुरावाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अशातच अमिताभ बच्चन यांनी नवीन वर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे.
Aishwarya Rai And Abhishek Bachchan : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी आहे. लाडक्या जोडींपैकी असलेले ऐश्वर्या अभिषेक गेले अनेक दिवस मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. गेले अनेक दिवस त्यांच्यातील दुराव्याबाबत बातम्या सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्या नावाची गोड मुलगी आहे. जितकी चर्चा ऐश्वर्या अभिषेकची असते तितकीच चर्चा आराध्या बच्चनचीही असते. ऐश्वर्या बच्चन कुटूंबाची लाडकी सून आहे. ऐश्वर्या आणि अमिताभ यांची केमेस्ट्री खूपच स्ट्रॉन्ग आहे. मात्र आता बीग बी यांच्या बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.
बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन त्यांची सून ऐश्वर्या राय आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन त्यांच्या दुरावाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. अशातच अमिताभ बच्चन यांनी नवीन वर्षी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचं सगळ्यात महागडं आणि सगळ्यात लग्जरी गोष्टीला भाड्याने दिलं आहे. हे सगळं त्यांनी का केलं आहे. त्याचरोबर काय आहे ही महागडी गोष्ट चला पाहूयात.
मुलीचं घर दिल्यानंतर अमिताभ यांनी घेतला मोठा निर्णय
आम्ही तुम्हाला सांगतो की, अमिताभ बच्चन नेहमी आपल्या प्रॉपर्टीमध्ये इंवेस्ट करतात. नुकतंच बीग बी यांनी त्यांचा प्रतिक्षा हा बंगला मुलगी श्वेता बच्चन यांना दिला होता. ज्यामुळेच बच्चन कुटूंबात काही तरी बिनसलं असल्याची चर्चा समोर आली आहे. आता अशी बातमी आहे की, त्यांनी लोटस सिग्नेचर बिल्डिंगमधील त्यांचं ऑफिस भाड्यावर दिलं आहे.
मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, ही प्रॉपर्टी जिद नाडियादवालाच्या ओशिवाराजवळ आहे. हे ऑफिस 10,000 स्क्वेअर फूट आहे. अमिताभ यांनी हे डिल ५ वर्षांसाठी केलं आहे. जे आजपासून म्हणजेच नवीन वर्ष 2024 पासून सुरू होणार आहे. या ऑफिसचं २.०७ कोटी रुपये उतकं भाडं आहे. तर सिक्योरिटी डिपॉजिटम्हणून १.०३ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे आजच्या बॉलीवूडमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांना इंडस्ट्रीचं पॉवर कपल असंही म्हणतात. अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये शाही पद्धतीने लग्न केलं होतं. या लग्नात बॉलिवूडचे सर्व मोठे स्टार्स सहभागी झाले होते.