Amitabh Bachchan Used to Smoke and Drink : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे कोणत्याही प्रकारची नशा करत नाहीत. ना ते मद्यपान करत नाहीत आणि त्यासोबत धुम्रपान देखील करत नाहीत. पण असं होतं नाही. एक वेळ होती जेव्हा ती इतकं मद्यपान करायचे की जर कोणी आकडा वाचला तर त्यावर विश्वास बसणार नाही. एक असा काळ होता जेव्हा मद्यपानाशिवाय बिग बी राहू शकत नव्हते. त्यावेळी हातात लागेल ती दारू ते प्यायचे. त्याशिवाय ते नॉन व्हेज देखील खायचे. पण मग सगळं काही बदललं. एका मुलाखतीत अमिताभ यांनी या सगळ्या सवयी किंवा व्यसनं कशा सोडल्या याविषयी सांगितलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1980 मध्ये इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत अमिताभ यांनी हा खुलासा केला. त्यावेळी या सगळ्या सवयी किंवा व्यसन सोडण्याचं कारण त्यांचं धार्मिक होणं नव्हतं. एका मुलाखतीत अमिताभ यांनी याविषयी सांगितलं की त्यांना परदेशात शूटिंगच्या दरम्यान, व्हेजिटेरियन जेवणं शोधण्यात खूप कठीण व्हायचं. त्यांनी सांगितलं की त्यांची आई तेजी बच्चन आणि पत्नी जया बच्चन या मांसाहार करायच्या त्यामुळे त्यांना या सगळ्याची अडचण कधीच झाली नव्हती.



हेही वाचा : समांथा-चैतन्यसाठी दाक्षिणात्य सिनेसृष्टी एकवटली! 'आम्ही शांत राहणार नाही', म्हणत संतापले; नेमकं घडलंय काय?


अमिताभ यांनी सांगितलं की 'मी धुम्रपान करत नाही, मद्यपान करत नाही किंवा मांस खात नाही. माझ्या कुटुंबात माझे वडील व्हेजिटेरियन अर्थात शाकाहारी होते आणि आई मांसाहारी होती. त्याप्रमाणेच जया मांसाहार करायची आणि मी नाही.' त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की ते कायम असे नव्हते. त्यांनी सांगितलं की 'मी मांसाहार करायचो, इतकंच नाही तर मद्यपान देखील करायचो आणि धुम्रपान देखील करायचो. मात्र, आता मी सगळं सोडलं आहे. कोलकातामध्ये एका दिवसाला मी 200 सिगारेट फुकायचो- हो, हे खरं आहे. 200! त्यानंतर मुंबईत आल्यानंतर मी सगळं काही सोडलं. मी मद्यपान देखील करायचो, काहीही, जी दारू हातात येईल ती मी प्यायचो. मात्र, काही वर्षांपूर्वी मी हे ठरवलं की मला हे सगळं करायचं नाही. परदेशात शूटिंग करत असताना माझ्या सवयींमुळे मला काही अडचणी होत नव्हत्या, कारण तिथे शाकाहारी जेवणं शोधणं खूप कठीण होतं.'