मुंबई : 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच आमिर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे रसिकांना या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आधी आमिर खानचा आणि आता अमिताभ बच्चन यांचा या चित्रपटातील लूक लीक झाला आहे. हॉलिवूड सीरिज आणि चित्रपटात दाखवल्या जाणार्‍या एखाद्या योद्ध्याप्रमाणे अमिताभ बच्चन दिसत आहेत. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील त्यांचा हा  लूक सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. 


व्हायरल होत असलेला बीग बींचा हा फोटो चित्रपटाच्या सेटवरील आहे. जेव्हा आमिर खानचा लूक लीक झाला होता तेव्हा संतापलेल्या आमिरने सुरक्षा व्यवस्था वाढवली होती.


‘ठग्स ऑफ हिंदुस्तान' या चित्रपटाचे  दिग्दर्शन विजय कृष्णा आचार्य  करत आहेत. पुढील वर्षी दिवाळीमध्ये हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.