मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन समाजात घडणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर परखड मत व्यक्त करतात. कोलकाताच्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल'मध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले होते, परंतु काही कारणांमुळे त्यांना फिल्म फेस्टिवलमध्ये उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी कलाविश्वातील बदलत्या संस्कृतीबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपट पाहण्याचा आजच्या पिढीचा दृष्टिकोन, चित्रपटाची कथा, रूपेरी पडद्याचं महत्त्व इत्यादी गोष्टींबद्दल त्यांनी आपले विचार मांडले आहेत. 'आता तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे. आधीच्या काळी फक्त मोठ्या पडद्यावर नवीन चित्रपट पाहणं शक्त होत. पण आता दिवस पूर्ण पणे बदलले आहेत. लॅपटॅपवर चित्रपट पाहण्यासाठी आजची पिढी प्रधान्य देते.' असं ते म्हणाले. 


मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची जी मजा आहे, ती मजा लॅपटॅपमध्ये नाही असं ते म्हणतात. 'नेटफ्लिक्स' आणि 'अमेझॉन प्राईन' यांसारख्या डिजिटल मध्यमांकडे प्रेक्षकांचा कल असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 


या खास दिनाचे औचित्य साधत त्यांनी कलाक्षेत्रात नाव कमावणाऱ्या महिलांबद्दल देखील चर्चा केली. बिग बींनी बंगाली कादंबरी 'अनुसंधान' वर आधारित चित्रपटात देखील काम केले होते. 'बरसात की एक रात' असं त्या चित्रपटाचं नाव होतं.  चित्रपटात बिग बींसोबत अभिनेत्री राखी गुलजार आणि अभिनेते अमजद खान यांनी मुख्य भूमिकेत झळकले होते.