Amitabh Bachchan Health Update : मेगास्टार बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे हैदराबाद येथे चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुर्घटनेत जखमी झाले होते. त्यांचा आगामी चित्रपट 'प्रोजेक्ट के' (Project K) च्या साहसी दृश्यांचे हैदराबादच्या सेटवर चित्रीकरण करत असताना हा अपघात घडला. या अपघातादरम्याने अमिताभ यांचे बरगड्या तुटल्या त्यामुळे ते आता मुंबईच्या घरी उपचार घेत आहे. अशी माहिती स्वत: अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर दिली. मात्र आता पुन्हा अमिताभ यांनी तब्येतीविषयी अपडेट ब्लॉगमधून दिली आहे. अमिताभ बच्चन तब्येतीविषयी नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया.... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan Health Update) यांच्या अपघातिविषयी माहिती मिळताच त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. सर्व चाहते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी मुंबईतून प्रार्थना सुरू केली. मात्र याच ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले की ते, सध्या त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहेत. माझा झालेल्या अपघाताविषयी ज्या ज्या लोकांनी चिंता व्यक्त केली, माझ्यासाठी प्रार्थना केली त्या सगळ्यांचे मी आभार मानेन. ज्या पद्धतीने तुम्ही सर्व माझ्यासाठी हळवे होते ते पाहून मी खरचं खूप भावूक झालो आहे. डॉक्टरांनी जे काही सांगितले आहे त्याचे मी खूप काटेकोरपणे पालन करत आहे. अशी माहिती अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमधून दिली.  



मात्र आता अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची आहे. कारण अमिताभ बच्चन यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी आरोग्याविषयी चाहत्यांना अपडेट दिली. अमिताभ बच्चन यांनी त्यांचा फोटो शेअर करत लिहिले की, माझ्या प्रकृतीसाठी सर्व प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद. मी दुरुस्त होत आहे. लवकरच रॅम्पवर परत येईल अशी आशा आहेय. अशी पोस्ट शेअर करत अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांचे आभार मानले. 


अमिताभ बच्चन यांचा 'प्रोजेक्ट के' हा सध्या मनोरंजनविश्वातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. 'प्रोजेक्ट के' हा चित्रपट 2 भागात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात कथेत सस्पेन्स पाहायला मिळणार असून दुसऱ्या भागात त्यामागची कथा सांगितली जाणार आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा एक सायन्स फिक्शन चित्रपट असून, त्याचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. सध्या या चित्रपटाचा पहिला भाग पूर्णपणे तयार झाल्याचे बोलले जात आहे. तिन्ही कलाकार यावेळी एक हटके भूमिकेत दिसणार आहेत.