ऐश्वर्यासोबत घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान अभिषेकची Insta Post; घेतला मोठा निर्णय
Abhishek Bachchan Big Decision: मागील अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये वाद असल्याची चर्चा सुरु असतानाच आता अभिषेकने ही पोस्ट केली आहे. या पोस्टमधील कंटेंटबरोबर अधिक एका गोष्टींनं अनेकांचं लक्ष वेधलंय.
Abhishek Bachchan Big Decision: अभिनेता अभिषेक बच्चनचं पत्नी ऐश्वर्या रायबरोबरचा कथित वाद सध्या चर्चेत आहे. या दोघांमधील मतभेद टोकाला गेले असून दोघे लवकरच घटस्फोट घेतील अशा चर्चा मनोरंजनसृष्टीमध्ये मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. मागील महिन्यामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंड यांच्या लग्न सोहळ्याला ऐश्वर्या लेक आराध्याबरोबर दाखल झाली तर दुसरीकडे संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र या सोहळ्याला आलं. यामुळेच ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबामध्ये बिसनल्याची चर्चा आहे. एकीकडे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटास्फोटाची जोरदार चर्चा असतानाच आता अभिषेकने मोठा निर्णय घेत एक पोस्ट केली आहे.
पोस्ट कशासंदर्भात?
अभिषेक बच्चन काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये ऑलिम्प स्पर्धेतील काही सामने पाहण्यासाठी गेला होता. त्याने येथील अनुभवांसंदर्भातील स्वत:च्या फोटोसहीत एक पोस्ट इन्स्टाग्रामवर केली आहे. मात्र या पोस्टपेक्षा त्याने पोस्टची जी सेटींग केली आहे त्याची आहे. या पोस्टमध्ये काय आहे ते आधी पाहूयात. अभिषेकने मंगळवारी इन्स्टाग्रामवर पॅरीस ऑलिम्पिक्स 2024 मधील काही फोटो शेअर केले. नीरज चोप्रा मैदानात असतानाचे काही फोटो अभिषेकच्या या पोस्टमध्ये आहेत. त्याने या फोटोला 'आयसिंग ऑन द केक' अशी कॅप्शन दिली आहे.
काय आहे पोस्टमध्ये?
आपल्या पॅरिस ट्रीपची झलक दाखवणारा एक व्हिडीओ अभिषेकने पोस्ट केला आहे. यामध्ये काही फोटोंचाही समावेश आहे. एका फोटोत तो भारतीय तिरंगा घेऊन स्टेडियममध्ये उभा असल्याचं दिसत आहे. अन्य एका फोटोत तो नीरज चोप्राला मिठी मारताना दिसत आहे. त्याने आयफेल टॉवरचेही काही फोटो व्हिडीओतून शेअर केले आहेत. खेळांच्या कुंभमेळ्यातील आपला दौरा कसा होता हे अभिषेकने चाहत्यांना दाखलं आहे.
कॅप्शनमध्ये काय म्हटलं आहे?
"पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा अनुभव भन्नाट होता. मी माझ्या ओमेगामधील मित्रांबरोबर गेलो होतो. आम्ही मागील 18 वर्षांपासून काम करत आहोत. त्यांचं बारीक गोष्टींकडे असणारं लक्ष आणि वेळ मोजण्याची क्षमता मला कायमच थक्क करते," असं अभिषेकने पोस्टमध्ये म्हटलं आहे. "शहरांमध्ये आणि खास करुन मैदानांमध्ये ऊर्जा आपोआपच जाणवत होती. त्यानंतर मला आपल्या नीरज चोप्राला परफॉर्म करताना पाहण्याची संधी मिळाली. तो क्षण या ट्रीममधील खरं तर आयसिंग ऑन द केक म्हणावा असा होता. आपला तिरंगा स्टेडियममध्ये पाहण्याचं भाग्य लाभलं. स्वर्गात असल्यासारखं वाटलं," असं अभिषेकने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
सेटिंगने वेधलं लक्ष
मात्र अभिषेकच्या या पोस्टमधील फोटो आणि व्हिडीओपेक्षा त्याने पोस्टची सेटींग बदलल्याची अधिक चर्चा आहे. अभिषेकने या पोस्टचं कमेंट सेक्शन डिसएबल करुन ठेवलं आहे. म्हणजेच या पोस्टवर कोणालाही काहाही कमेंट करता येणार नाही., खासगी आयुष्यासंदर्भात सुरु असलेल्या चर्चेसंदर्भातील प्रतिक्रियांपासून दूर राहण्यासाठी अभिषेकने या कमेंट डिसएबल केल्याची चर्चा आहे. अभिषेकने घटस्फोटाच्या चर्चांना हवा दिली आहे की काय अशीही शक्यता त्याच्या या निर्णयामुळे व्यक्त केली जात आहे.