अमरीश पुरी यांच्या `या` 10 भूमिका कधीच कोणी विसरु शकत नाही, 40व्या वर्षात मिळाला सगळ्यात मोठा सिनेमा
अभिनयाच्या आवडीमुळे अमरीश पुरी यांनी 20 वर्षांची सरकारी नोकरी सोडली
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता अमरीश पुरी आजही आपल्या व्यक्तिरेखांमुळे लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. अभिनयाच्या आवडीमुळे अमरीश पुरी यांनी 20 वर्षांची सरकारी नोकरी सोडली. वयाच्या 40 व्या वर्षी अमरीश पुरी यांना पहिला मोठा सिनेमा आणि चांगली भूमिका मिळाली. या सिनेमाने त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून दिली. अमरीश पुरी यांच्या कारकिर्दीमधील वडील आणि खलनायकाच्या भूमिका सर्वात लोकप्रिय आहेत.
जालंधर ते शिमला मग मुंबई
22 जून 1932 रोजी पंजाबमधील जालंधरमधील नवांशहर येथे जन्मलेल्या अमरीश पुरी वाचनात हुशार होते. त्याचं संपूर्ण नाव अमरीश लाल पुरी होते. शिमलाच्या बीएम कॉलेजमधून शिक्षण घेत असताना ते अभिनयाकडे वळले आणि नाट्यगृहात काम करायला सुरवात केली. दरम्यान, त्यांना कर्मचारी राज्य विमा महामंडळात नोकरी मिळाली.
400 हून अधिक चित्रपट आणि बरेच पुरस्कार
1971मध्ये रिलीज झालेला 'रेश्मा आणि शेरा' या चित्रपटात अमरीश पुरी रेहमत खानच्या भूमिकेत दिसले होते. 1970 मध्ये अमरीश पुरी यांचा प्रेम पुजारी रिलीज झाला या सिनेमात त्यांनी छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र त्यांना ओळख मिळाली ती 'रेश्मा आणि शेरा' चित्रपटामधून.
अमरीश पुरी यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या. त्यातील अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी वडील आणि खलनायकाच्या भूमिका साकरल्या. अमरिश पुरी यांना त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी 3 फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारही मिळाले.
अमरीश पुरी यांच्या कधीच विसरु नं शकणाऱ्या भूमिका
भैरोंनाथ, मोगँबो, जनरल डोंग, चुनिया मामा, बैरिस्टर चड्ढा, चौधरी बलदेव, किशोरीलाल, राजा साहब, अशरफ अली, बलराज चौहान या भूमिकांना चाहत्यांच्या मनावर जादू केली. या भूमिका हिट झाल्या.