मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात खतरनाक खलनायक म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी. अमरीश पुरी यांचा नातू वर्धन पुरी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. वर्धन आता आपल्या आजोबांची ओळख पुढे नेऊ इच्छित आहे. वर्धन निर्माता जयंतीलाल गाडा यांच्या सिनेमातून डेब्यू करत आहे. हा एक रोमँटिक थ्रिलर सिनेमा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिनेमाच्या रोल करता वर्धन ट्रेनिंग घेत आहे. या सिनेमातील लिडींग लेडी देखील फायनल झालेली आहे. या सिनेमाची शुटिंग सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे. या अगोदर वर्धन 'इशकजादे' आणि 'दावत - ए - इश्क' यासाठी हबीब फॅसल आणि 'शुद्ध देसी रोमांस' करता मनीष शर्माला असिस्ट केलं आहे. 



वर्धन आता आपल्या आजोबांचे गुरू आणि नॅशनल अवॉर्ड जिंकणारा अभिनेता सत्यदेव दुबेकडून ट्रेनिंग घेतलं आहे. मला लिहिणं आणि दिग्दर्शनाची देखील आवड आहे. मात्र मला सर्वाधिक अभिनय आवडतो. दुबेजींनी मला बॅकस्टेजचं काम दिलं आहे. त्यावेळी मी कास्ट आणि क्रू ला चहा देखील प्यायला दिली आहे, कधी स्टेज ही साफ केला आहे.


एका मुलाखतीत वर्धनने म्हटलं की, मी एक पीरियड ड्रामा फिल्मसोबत डेब्यू करत आहे. मात्र ती काही कारणामुळे झाला नाही. मग जयंती भाईंनी मला दुसरा सिनेमा ऑफर केला आणि मला त्याची गोष्ट आवडली आणि मी लगेच हो म्हटलं.