मुंबई : करिना कपूरने नेहमीच वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये हे सांगितलं की, तिला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं. पण करिनाबाबत एक खुलासा झालाय. यातून हे समोर येतं की, तिला कधीही अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला वेगळ्याच क्षेत्रात जायचं होतं. 


बेस्ट फ्रेन्डने केला खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करिना बद्दलचा हा खुलासा केलाय तिची बेस्ट फ्रेन्ड अमृता अरोराने. अमृताने शाहरूख खानच्या ‘बातें विथ बादशाह’ या शोमध्ये हा खुलासा केलाय. यात तिने सांगितले की, करिना आणि तिची भेट मुंबईतील एका थिएटरमध्ये झाली होती. त्यावेळी दोघींमध्ये बरीच चांगली मैत्री झाली होती. तिने हेही सांगितली की, फार कमी लोकांना हे माहिती असेल की, करिनाला कधीही अभिनेत्री व्हायचं नव्हतं. 


काय व्हायचं होतं करिनाला?


अमृताने सांगितले की, हे फार कमी लोकांना माहिती असेल की, करिनाला अभिनेत्री नाहीतर लॉयर व्हायचे होते. अशीतशी लॉयर नाहीतर तिला क्रिमिनल लॉयर व्हायचं होतं. अमृता सांगते की, करिनामध्ये एक चांगली लॉयर होण्याचे सर्व गुण आहेत. तिची कन्विंसिंग पॉवर खूप चांगली आहे. 


करिना आणि अमृता अनेक वर्षांपासून चांगल्या मैत्रीणी आहेत. दोघीही अजूनही जिममध्ये सोबत जातात. करिना सध्या आपल्या मुलाला वेळ देत आहे. पण तिच्या चाहत्यांचे डोळे तिच्या कमबॅककडे लागले आहे.