मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव (Amrita Rao) नुकतीच आई झाली आहे. आता तिचा नवरा अनमोलने मुलगा वीरचा (Amrita Rao Son) फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, हे पाहून चाहते त्यांचे खूप अभिनंदन करत आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये अमृता राव (Amrita Rao Delivery) आई झाली व तिने मुलाचे नाव वीर ठेवले. अमृता, पती अनमोल आणि मुलगा वीर पहिल्यांदाच एका फ्रेममध्ये दिसत आहेत.


अमृताच्या नवऱ्याने शेअर केला फोटो



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री अमृता रावने  (Bollywood Actress Amrita Rao)आपला मुलगा वीर याची पहिली झलक जगासमोर दाखविली. अमृता राव यांचे पती अनमोल (RJ Anmol Instagram) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपला मुलगा वीर आणि पत्नीसोबत दिसला आहे. हा फोटो शेअर करत अनमोलने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, 'आमचा संसार, आमचा आनंद ... वीर'



अमृताने व्यक्त केला आंनद


काही काळापूर्वी अमृतारावने (Amrita Rao Instagram) इंस्टाग्रामवर प्रथमच आई होण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की, 'मला सांगायला आवडेल अशी गोष्ट म्हणजे मी अजूनही हा आनंद स्वीकारण्याचा प्रयत्न करीत आहे. मी दररोज वीरकडे पाहते आणि विचार करते की मी खरोखर आई झाली आहे की नाही. आई होण्याचा आनंद हा वेगळ्या प्रकारची भावना आहे. वीरच्या जन्मानंतर माझा प्रत्येक दिवस आनंदात परिपूर्ण आहे आणि मी उत्साहि आहे. माझ्यामध्ये भावनांचे अनेक प्रकार आहेत, जे व्यक्त करणे कठीण आहे.


2016 मध्ये केले लग्न


अमृता रावने (Amrita Rao Filmi Career) २००२ साली 'अब के बरस' या चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. पण हिंदी चित्रपटसृष्टीत तिला 'इश्क-विश्क' (Ishq Vishq) या चित्रपटापासून प्रसिद्धी मिळाली. अमृता रावने  (Amrita Rao Husband) तिच्या प्रियकर आरजे अनमोलसोबत 15 मे 2016 रोजी मुंबईत लग्न केले आणि आता त्यांना एक मुलगा आहे.