सिनेमासाठी काहीपण, साराने उचललं हे पाऊल
असा सारा अली खानचा प्रवास
मुंबई : बॉलिवूडमध्ये 7 डिसेंबर रोजी आणखी एका स्टार किडने एन्ट्री घेतली. सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची सुंदर आणि हुशार मुलगी सारा अली खान 'केदारनाथ' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत एन्ट्री केली आहे.
सारा अली खानचा अभिनय आणि तिच्या आत्मविश्वासाची सगळीकडेच चर्चा होत आहे. केदारनाथ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलीच कमाई केली आहे. सारा अली खानचा बॉलिवूडमधील डेब्यू सहज शक्य नव्हता. कारण सारा तब्बल 96 किलोंची होती.
सारा ही अतिशय क्यूट आणि चबी मुलगी होती. पण करिअरला सुरूवात करण्यापूर्वी तिने स्वतःला फॅटवरून फिटपर्यंत आणलं आहे. चार महिने प्रचंड मेहनत आणि योग्य डाएटच्या मदतीने 30 किलो वजन 4 महिन्यात कमी केलं आहे.
सारा आपल्या कॉलेजच्या शेवटच्या दिवसांत घरापासून लांब होती. जेव्हा ती पुन्हा आली तेव्हा अमृता सिंहने देखील साराला एअरपोर्टवर ओळखल नव्हतं. आईनेच मुलीला तिच्या सुटकेस वरून ओळखलं. एवढा बदल सारामध्ये झाला होता.
साराचं म्हणणं आहे की, वजन कमी करण्यासाठी वर्कआऊटची गरज असते. वर्कआऊट तुमच्या शरिरातून एक्स्ट्रा फॅट काढून टाकतात. जर जिमला जाणं पसंद नसेल तर तुम्ही इतरही वर्कआऊट करू शकता. जे तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता.
बॉक्स ऑफिस आता साला अली खान आणि सुशांत सिंह राजपूत यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'केदारनाथ' 7 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. एक हिंदू टूरिस्ट म्हणजे सारा अली खान आणि एक मुस्लिम पिट्ठू सुशांत सिंह राजपूत यांच्यावर आधारित ही प्रेम कहाणी आहे. एका दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिस कलेक्शन एवढी रुपयांची कमाई केली आहे.
सिनेमात सुशांत सिंह राजपूत एक गाइड साराला घेऊन भगवान शिवच्या दर्शनाकरता 14 किमीचा प्रवास करतो. केदारनाथ हा सिनेमा 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाची कथा आहे. या महाप्रलयात हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.