The Kerala Story ला मराठी कलाकार का प्रमोट करत नाही? Amruta Khanvilkar ने एका वाक्यात उत्तर दिलं
The Kerala Story या चित्रपटाला ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून विरोधाचा सामना करावा लागत आहे. अनेक लोक या चित्रपटाच्या कॉन्ट्रोव्हर्सीपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही लोक या चित्रपटातून चुकीची माहिती दिल्याचा सांगितले आहे. अशात या चित्रपटाचं प्रमोशन मराठी कलाकार का करत नाही या प्रश्नावर अमृता खानविलकरनं उत्तर दिलं आहे.
The Kerala Story: सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरु आहे आणि तो म्हणजे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा द केरला स्टोरी. या चित्रपटानं पाच दिवसात बॉक्स ऑफिसवर कमाईत 50 कोटींचा आकडा पार केला आहे. हा चित्रपट रोज कोणत्या ना कोणत्या वादात अडकत आहे. तरी कमाईच्या बाबतीत चित्रपट मागे राहिलेला नाही. चित्रपटाला प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अशात या चित्रपटावरून आता एक नवा वाद समोर आला आहे. द केरला स्टोरी या चित्रपटाचं प्रमोशन मराठी कलाकार का करत नाही? असा सवाल नेटकऱ्यांनं अभिनेत्री अमृता खानविलकरला केला आहे. त्यावर अभिनेत्रीनं दिलेल्या उत्तराना एकच चर्चा सुरु झाली आहे.
खरंतर अमृतानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अमृतानं पांढऱ्या आणि काळ्या रंगाचा एक ऑफ शोल्डर टॉप परिधान केला आहे. या फोटोत अमृता तिच्या ट्रिपचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत That warm fuzzy feeling अशी कमेंट केली आहे. अमृताचा हा फोटो लंडनमधील आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. पण एका नेटकऱ्यांनं अमृताला चक्क द केरला स्टोरी या चित्रपटावरून प्रश्न विचारला आहे.
हेही वाचा : The Kerala Story चित्रपटानं Box Office वर पार केला 50 कोटींचा आकडा, कमाईत देणार 'काश्मीर फाईल्स'ला टक्कर!
अमृताच्या या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, 'मॅडम द केरला स्टोरीला... मराठी इंडस्ट्री सपोस्ट का करत नाही? सर्व तरुण युवक या चित्रपटाला प्रमोट करत आहेत. तर लोकांची अपेक्षा आहे की, आघाडीचा फॅन बेस असणाऱ्या कलाकारांनी देखील या चित्रपटाला सपोर्ट केला पाहिजे. मला माहित आहे की हे तितके सोपे नाही. पण तरीही...' नेटकऱ्यानं केलेली ही कमेंट पाहता अमृतानं त्याला उत्तर दिले आहे. अमृता म्हणाली, 'मी लंडनमध्ये आहे. अजून मी तो (द केरला स्टोरी) चित्रपट पाहिला नाही. मी महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट पाहिला आहे आणि प्रमोट देखील केला आहे. तुम्ही 'महाराष्ट्र शाहीर' पाहिला का?' असा सवाल अमृतानं केला आहे. पण अमृतानं दिलेलं उत्तर त्या नेटकऱ्याला पटलेलं नाही. त्यानं पुढे अमृताला उत्तर देत आणखी एक प्रश्न विचारला 'हो, मी पहिल्या प्रायोरिटीनं मराठी चित्रपट केला, पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तू कधी द केरला स्टोरी चित्रपट पाहणार...'