Amruta Khanvilkar In Kokan: अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या दिलखेचक अभिनयानं आणि नृत्यानं प्रेक्षकांची कायमच मनं जिंकून घेते. अमृता ही उत्तम डान्सर आहे सोबतच ती उत्तम अभिनेत्रीही आहे. मागच्यावर्षी आलेल्या तिच्या 'चंद्रमुखी' या चित्रपटानं रूपेरी पडद्यावर चार चांद लावले होते. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली आहे. तिच्या या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली. 'चंंद्रा' हे गाणंही प्रचंड व्हायरल झाले. तिच्या या सदाबहार गाण्यानं आत्तापर्यंत युट्यूबवर 200M व्हूजचा टप्पा पार केला आहे. मध्यंतरी अमृताचे लंडनमधील फोटोही व्हायरल झाले होते. परंतु आता अमृता कोकणात दिसते आहे. त्यामुळे तिच्या कोकण दौऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. चाहते तिला कमेंट्समध्ये विचारतायत की नक्की कोकणात काय करते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या या व्हिडीओलाही चाहत्यांच्या तूफान कमेंट्स आल्या आहेत. यावेळी अमृता कोकणात एन्जॉय करताना दिसते आहे. या व्हिडीओमध्ये अमृता ही समुद्रकिनारी दिसते आहे. यावेळी तिनं पिवळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस घातला आहे. तिनं बिचवरीलही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी ती समुद्रकिनारी मस्त एन्जॉय करताना दिसतो आहे आणि यावेळी मस्त ढगाळ पावसाळी वातावरणही झाले आहे. तिनं यावेळी मस्त स्कार्फ घेत पावसाळी वातावरणाचा अमृता आनंद लुटताना दिसते आहे. सोबतच तिनं मस्त समर लुक कॅरी केला आहे. या व्हिडीओसह तिनं 'अग्गं बाई अरेच्चा' या चित्रपटातील 'मन उधाण वाऱ्याचे' हे गाणं लावलं आहे. 


हेही वाचा  - सोनम कपूरने परिधान केलेल्या टायगर प्रिंट शालीची एकच चर्चा, या किंमतीत घ्याल आलिशान गाडी


यावेळी अमृता मासेमारी करताना दिसते आहे. सोबतच मातीचे मडकं बनवातानाही दिसते आहे. त्यामुळे सध्या तिच्या या व्हिडीओखाली नानातऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. अनेक जण तिला असं विचारतायत की ती नक्की कुठे फिरते आहे यावर अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत. अनेक जण तिला विचारतायत की ती मांडवी रत्नागिरीला आहे का. त्याचसोबत सर्वांनी तिच्या या नव्या एडवेन्चरबद्दल कौतुक केले आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या अमृताची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. त्यामुळे तिच्या फोटोंचीही चांगलीच चर्चा रंगते. ती आपल्या चाहत्यांनाही कायमच अपडेट ठेवत असते. आपल्या पती हिमांशुसोबत आणि आई व बहिणीसोबतही ती अनेकदा आपल्या फॅमिली फोटो हे शेअर करताना दिसते. त्यामुळे तिच्या फोटोंनाही प्रचंड लाईक्स आणि कमेेंट्स येताना दिसतात.