`प्यार किया तो डरना क्या...` अभिनेत्रीचं गुपचूप लग्न, सत्य समोर येताचं सर्वांना धक्का
अभिनेत्रीचं बॉयफ्रेंडसोबत गुपचूप लग्न, आज आहे एक मुलाची आई...
मुंबई : आपल्या आवडत्या सेलिब्रिटींबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. सेलिब्रिटींची खासगी आयुष्य आणि प्रोफेशल आयुष्य कसं असतं, याबद्दल फार कमी लोकांना माहिती असतं. आता अभिनेत्री अमृता रावच्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा रंगत आहेत. अमृताने 7 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आरजे अनमोलसोबत लग्न केलं. आता अमृताने अनमोलसोबत असलेल्या नात्याबद्दल अनेक गोष्टींचा खुसासा केला.
अमृताने You Tube शो कपल ऑफ थिंग्स'च्या एपिसोडमध्ये गुपचूप केलेल्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला. अमृता आणि अनमोलने 2014 साली केलेल्या लग्नाचा खुलासा 2016 साली केला. अमृता आणि अनमोलने 2014 साली 'सिक्रेट विवाह' केला होता.
कपलने सांगितलं की, 'सिक्रेट विवाह आमच्यासाठी फार थरारक होतं. यासाठी केलेली प्लानिंग यापेक्षा अधिक थरारक होती.' 'कपल ऑफ थिंग्ज' च्या पुढच्या भागात दोघांनी 'सिक्रेट विवाह'बद्दलचा किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पाहा व्हिडीओ...
'विवाह' सिनेमातील अमृताच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. सिनेमातील अमृता आणि अभिनेता शाहीद कपूरची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
आता अमृता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अमृता सतत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.