Anand Mahindra On Vicky Kaushal : अभिनेता विकी कौशल आणि सान्या मल्होत्रा यांचा सॅम बहादूर (Sam Bahadur) हा चित्रपट आज चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतोय. अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने लाखोंची कमाई केल्यानंतर आता सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार हे नक्की, अशातच आता अनेकांनी सॅम बहादूरमधील विकी कौशलच्या (Vicky Kaushal) कलाकारीचं कौतूक केलं आहे. अशातच आता सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव राहणारे आणि महिंद्रा अँड महिंद्राचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट करत विकी कौशलचं कौतूक केलंय.


काय म्हणाले Anand Mahindra ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा देशभक्तीवर सिनेमा तयार केला जातो, जेव्हा देशाच्या खऱ्या हिरोवर सिनेमा तयार होतो, तेव्हा शक्ताशाली पुण्य चक्र तयार होतं. जेव्हा सैनिकांच्या जिद्धीची कहाणी असते तेव्हा लोकांचा आत्मविश्वास आणि गौरव अनेकपटींनी वाढतो. लोकांना माहित असतं की तुमच्या कर्तृत्वाचा सन्मान होणार आहे. तेव्हा अनेक नायक उभे राहतात. हॉलिवूडने देखील एका जमान्यात असंच पुण्य चक्र तयार केलं होतं. अशी भन्नाट मूव्ही तयार केल्याबद्दल रॉनी स्क्रूवाला याचं आभार, असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.


खासकरून 'गजब का बंदा, सबका बंदा' या गाण्यासाठी आभार, चित्रपट निर्दोष नाही, पण, केस वाढवणाऱ्या आणि पुरस्कार विजेत्या व्यक्तिरेखेमध्ये विकी कौशलने स्वत:ला सॅम बहादूरमध्ये रूपांतरित करतो, याला पाहून एका प्रामाणिक हिरोचा आदर वाढतो, असं आनंद महिंद्रा म्हणतात.



दरम्यान, 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्धचे युद्ध जिंकलेल्या फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात सॅम बहादूरचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सॅम यांच्या खोडकर वृत्तीचे आणि विनोदाचे अनेक किस्से आजही खूप प्रसिद्ध आहेत. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून दिग्गज व्यक्तीची खरी कहाणी अडीच तासांत दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सॅम माणेकशॉंच्या पत्नी सिल्लूच्या भूमिकेत सान्या मल्होत्राने चांगला अभिनय केलाय.