Anant Ambani and Radhika Merchant Cruise Party : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाला महिनाभरापेक्षा कमी वेळ उरला आहे. पण त्यांच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांना मार्चपासून सुरुवात झाली आहे. प्रत्येकवेळी आपल्याला वाटायचं की हा शेवटचा कार्यक्रम असेल त्यानंतर लगेच दुसरा कार्यक्रम सुरु व्हायचा. आता हे दुसरं प्री-वेडिंग पार्टी आहे. यावेळी संपूर्ण अंबानी कुटुंब हे इटली ते फ्रांस असा प्रवास लग्झरी क्रुजवरून करणार आहे. आता क्रुझवरील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकी बॉय बॅन्ड 'बॅकस्ट्रीट बॉईज' यांनी या क्रुझवर परफॉर्म केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. असा दावा करण्यात आला आहे की हा काल रात्रीचा परफॉर्मन्स आहे. तर या बॅन्डनं अनंत आणि राधिकाच्या पाहुण्यांसाठी खास परफॉर्मन्स केला आहे. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर उपस्थित पाहून एन्जॉय करताना दिसत आहेत. दरम्यान, ही क्रुझ पार्टी आज म्हणजे शुक्रवारी फ्रान्समध्ये संपणार आहे. या पार्टीसाठी अनेक बॉलिवूज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अंबानी कुटुंबाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक फॅन पेज आहेत. त्या पेजवर क्रुझवरील फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत. सेलिब्रेशन सुरु होण्याच्या एक दिवस आधीपासून त्यांचं शेड्यूल व्हायरल झालं होतं. दरम्यान, आता रणवीर सिंगचा क्रुझवरील फोटो व्हायरल होतोय. यावेळी रणवीर त्याची पत्नी दीपिकाशिवाय या प्री-वेडिंग कार्यक्रमाला पोहोचला आहे. डिझायनर शिल्पानं शेअर केलेल्या फोटोत रणवीरनं गडद निळ्या रंगाचं शर्ट आणि पांढऱ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. मात्र, काही वेळात डिझायनरनं ही पोस्ट डिलीट केली. 



हेही वाचा : ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या दिवशी होणार प्रदर्शित



दरम्यान, अनंत आणि राधिकाच्या लग्नाची पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल होतेय. निमंत्रण शेअर करत एएनआयनं लिहिलं की अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचं लग्न 12 जुलैला मुंबईच्या बीकेसीच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये होणार आहे. लग्न पारंपरिक हिंदू वैदिक पद्धतीनं होणार आहे. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार या आधी जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंगमध्ये 1200 पेक्षा जास्त पाहुण्यांनी हजेरी लावली होती. तर यावेळी क्रुझवर ती यादी कमी करत फक्त 800 पाहुण्यांना बोलावलं आहे.