Anant Ambani-Radhika Merchant's Wedding  : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरात सध्या लग्नीनघाई सुर आहे. लवकरच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अनंत अंबानींचा साखरपुडा राधिका मर्चंट हिच्यासोबत गेल्या वर्षी 2023 थाटामाटात संपन्न झाला असता. यानंतर ते कधी लग्न करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अंबानी कुटुंबातील कुठलाही सोहळा असो तो मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. त्यामुळे अंबानी कुटुंबातील सर्वात लहान मुलाचं लग्न म्हटल्यावर मुकेश आणि नीता अंबानी या लग्नात कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही.  त्यातच आता अनंत आणि राधीका यांच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनची तयारी सुरु झाली आहे. तेवढच नाही तर या प्री वेडिंग सेलिब्रेशनच्या दिवशी नृत्यही सादर करण्यासाठी सराव सुरु झाला आहे. या सरावासाठी बॉलिवूडचे लाडके कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर खास जामनगरा पोहचले असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  


अनंत-राधिकाच्या लग्नात डान्स करणार रणबीर-आलिया?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बॉलिवूडचे कलाकार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे आकाश अंबानी (अनंतचा मोठा भाऊ) सोबत जामनगरमधील फार्महाऊसच्या कॉरिडॉरमध्ये फिरताना दिसत आहेत. या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे , ती म्हणजे रणबीर-आलिया हे दोघेही अनंत अंबानीच्या लग्न कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत आणि त्यामुळेच ते डान्स प्रॅक्टिससाठी जामनगरला पोहोचले आहेत. व्हिडीओमध्ये आकाश पांढरा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. तर रणबीर-आलिया देखील कॅज्युअल लूकमध्ये आहेत आणि त्यांच्या हातात चष्मा आहे.



अनंत-राधिका बालपणीचे मित्र


गेल्या वर्षी जानेवारी 2023 मध्ये अनंत अबांने त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंट यांचा साखरपुडा पार पडला. अंबानी हाऊसमध्ये पारंपारिक शैलीत हा विवाहसोहळा पार पडला जाणार आहे. ज्यात बॉलिवूड, क्रीडा आणि व्यावसायिक जगतातील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती.


कोण आहे राधिका मर्चंट?


राधिका ही प्रसिद्ध भारतीय उद्योगपती एनकोर हेल्थकेअरचे सीईओ बिरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिकाने डी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने पुढील शिक्षण मुंबईतील द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून घेतले. राधिकाने न्यूयॉर्क विद्यापीठातून पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्समध्ये पदवी मिळवली आहे.