मुंबई : आजचा दिवस अंबानी कुटूंबीयांसाठी खूप खास आहे.कारण आज अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री वेडिंग फंक्शनला सुरुवात झाली आहे. या खास क्षणांचा हिस्सा बनण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली आहे. कलाकार आका जामनगरला पोहचले आहेत. अनेकजण आता एअरपोर्टवर स्पॉट होत आहेत. याच यादीत आता सैफ अली खानची संपुर्ण फॅमिलीचा समावेश झाला आहे. करिना सैफ आणि तिची दोन मुलं नुकतीच एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. जामनगर जाण्याआधी सैफ अली खानची पुर्ण फॅमिली ज्यामध्ये सारा अली खान, करीना कपूर, इब्राहिम अली खान, तैमूर खान  जेहचा सामावेश आहे.ज्यामध्ये संपुर्ण कुटूंबाचं खास बॉन्डिंग पहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सैफ अली खान त्याची पत्नी करीना कपूर खान आणि जेह आणि  तैमूरसोबत एअरपोर्ट  स्पॉट झाले आहेत. यानंतर त्यांची भेट तिथे उपस्थित असलेल्या त्याची मुलगी सारा अली खान आणि इब्राहिम खानसोबत होते. या दरम्यान त्याचे वडिल सैफ अली खान त्याच्या मुलांशी आदराने बोलताना दिसत आहे.त्याची मुलंही त्याच्याशी आदरपुर्वक बोलताना दिसत आहे.तर करिनाचंही त्याच्या सावत्र मुलांशी खूप खास बॉन्डिंग दिसत आहे. दोघंही एकमेकांशी खूप आदराने बोलताना दिसत आहे.सध्या सोशल मीडियीवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


खरंच प्रेग्नंट आहे का करिना?
समोर आलेल्या व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र अनेकांनी करिनाला पाहून करिना प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत म्हटलंय, करिना कपूर प्रेग्नंट आहे. एकाने कमेंट करत लिहीलं, करिना खरंच प्रेग्नंच आहे का? तर अजून एकाने लिहीलंय, करिना प्रेग्नंट वाटतेय. तर अजून एकाने लिहीलंय, करिना प्रेग्नंट आहे. अशा अनेक प्रकारच्या कमेंट करत युजर्स या व्हिडीओवर करत आहेत. शाहरुख खान,सलमान खान यांसारखे अनेक मोठे स्टार्सही येथे पोहोचले आहेत.