Anant Radhika Shiv Shakti Puja : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी अनंत आणि राधिकासाठी अॅन्टिलियामध्ये शिव शक्ती पूजेचे आयोजन केले होते. या पूजेत अंबानी कुटुंबानं शिवलिंगावर अभिषेक केला आणि माता शक्तिची पूजा केली. या शिव शक्ती पूजेतील अॅन्टिलियामधील काही इनसाईड व्हिडीओ समोर आले आहेत. त्यात संपूर्ण कुटुंब हे महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाले.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिव शक्ती पूजेचे इनसाईड व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी, श्लोका मेहता आणि होणारा नवरदेव अनंत अंबानी आणि नवरी राधिका मर्चेंट यावेळी दिसले. हे सगळे शिवलिंगावर अभिषेक करताना दिसत आहेत. इतकंच नाही तर महादेवाची उपासना देखील करताना दिसले. व्हिडीओत सगळ्यांच्या हातात पूजेचा ताट दिसला आणि त्यांनी शिवलिंगावर दूध आणि दहीनं अभिषेक केला. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

व्हिडीओमध्ये सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे अंबानींच्या घरात खास या पूजेसाठी महादेवाची भव्य पिंड साकारली. त्याशिवाय या कार्यक्रमात अमित त्रिवेदी त्याचं 'नमो नमो' हे लोकप्रिय ठरलेलं गाणं गातांना दिसतोय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

या व्हिडीओमध्ये पूजा केल्यानंतर अंबानी कुटुंबानं महादेवाचा जयजय कार केला. ही शिव शक्ती पूजा करण्यासाठी एक किंवा दोन नाही तर अनेक पंडित दिसले आणि संपूर्ण विधीनं शिव शक्तीची पूजा केली. या पूजेत फक्त अंबानी कुटुंब नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 


ज्योतिष शास्त्रानुसार, लग्नाआधी शिव शक्तिचे पूजन केल्यानं नवरदेव आणि नवरी हे त्यांच्या या नवीन आयुष्यात आनंदी राहतात. त्यासोबत त्यांना महादेव आणि पार्वती यांचे आशीर्वाद लाभतात. त्यासोबतच होणाऱ्या नवरदेव आणि नवरीला कधीच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यासोबतच नवग्रह हे शांत होतात आणि आयुष्य हे आनंदी जातं. 


हेही वाचा : थाट इटलीत, जीव वडापावमध्ये... अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील Inside Video व्हायरल; Egg Rolls चाही समावेश


दरम्यान, आज 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका हे सप्तपदी घेणार आहेत. अंबानी कुटुंब हे सुरुवातीपासून सगळ्या विधी-परंपरांचे पालन करत असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर अंबानी कुटुंबाच्या सगळ्या कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते.