Ananya Panday compared with Urfi Javed : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. चित्रपटसृष्टीत अनन्यानं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, अनन्या सतत चर्चेत असण्याचं कारण हे तिचं खासगी आयुष्य राहिलं आहे. मात्र, आता अनन्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अनन्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फीशी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनन्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. त्यात अनन्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. या फोटोत अनन्यानं काही तरी हटके ड्रेस परिधान केला आहे. खरंतर या पोस्टमध्ये अनन्यानं सगळ्यात पहिलं शेअर केलेल्या फोटोत तिनं फुलपाखरूच्या आकाराचा (ड्रॅगन फ्लाई) टॉप परिधान केला आहे. तर त्यासोबत वेलवेल स्कर्ट परिधान केलं आहे. ते पाहून असं वाटतं की अनन्याच्या अंगावर मोठं फुलपाखरु बसलं आहे. हे फोटो शेअर करत अनन्यानं कॅप्शन दिलं की 'पॅरिस कॉइचर वीकमध्ये राहुल मिश्रासाठी वॉक करत असताना मला या सुपरहीरोंची नक्की काय विचार असतात त्याची कल्पना आली आणि ती आवडली सुद्धा.' 



दरम्यान, अनेकांनी अनन्याचा हा लूक पाहून तिची तुलना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेदशी करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'उर्फीची बहिणी जुर्फी भेटली.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'उर्फी जावेद लाईट.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'उर्फीनं केलं की ट्रोल करतात आणि अनन्यानं केलं की तिची स्तुती करतात.' आणखी एक नेटकरी म्हणला, 'ही उर्फीला भेटून आली वाटतं.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'उर्फी जावेदकी सस्ती कॉपी.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'क्लासी तरी उर्फी.' तर काही नेटकऱ्यांनी अनन्याची स्तुती केली आहे. अनन्याचा फोटो पाहिल्यानंतर त्यांनी म्हटलं अनन्याला अशी फॅशन शोभते उर्फीला नाही.


हेही वाचा : 'ही' अट मान्य नसल्याने रवी शास्त्रीची बायको होता-होता राहिली अमृता सिंग


अनन्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा नेटफ्लिक्सवर 'खो गए हम कहां' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याआधी ती 'ड्रीम गर्ल-2' मध्ये दिसली होती. याशिवाय ती लवकरच 'द अनटोल्ड स्टोरी', विक्रमादित्य मोटवानी यांच्या सायबर-थ्रिलर 'कंट्रोल' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘कॉल माई बे’ आणि अक्षय कुमारच्या ‘शंकरा’ या चित्रपटात दिसणार आहे.