मुंबई : सगळ्यांना माहित आहे की स्टारकिड्स सुहाना खान, शनाया कपूर आणि अनन्या पांडे हे बेस्ट फ्रेंड आहेत. तिघीही बालपणीच्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनी खूप वेळ एकत्र घालवला आहे. अनन्या पांडेचा तिची मैत्रिण सुहाना खानचा भाऊ आर्यन खानसोबत चांगले संबंध आहेत. पण अनन्या पांडेचं तिच्या मैत्रिणीचा भाऊ आर्यनवर क्रश होतं हे तुम्हाला माहीत आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनन्या पांडेचा मोठा खुलासा
कॉफी विथ करण या शोमध्ये अनन्या पांडेने याचा खुलासा केला आहे. सुहाना खान आणि शनाया कपूर यांच्या मैत्रीविषयी बोलल्यानंतर करण जोहरने अनन्याला विचारलं, तुमच्यापैकी कोणाचंही  सुहाना खानचा भाऊ आर्यन क्रश नव्हता का? यावर उत्तर देताना अनन्या म्हणाली, ''तो क्यूट आहे तो माझं क्रश होता.  यानंतर करण जोहरने विचारलं, पण मग क्रश झाल्यानंतरही तुमची लव्हस्टोरी का पुढे गेली नाही? अनन्या लगेच म्हणाली, ते तुम्ही आर्यनलाच विचारा.


अनन्या कोणाला डेट करत आहे?
कॉफी विथ करणमध्ये अनन्या पांडेच्या लव्ह लाईफचा खूप उल्लेख झाला होता. शोचा नवीन भाग पाहिल्यानंतर, तुम्हाला तिच्या रिलेशनशिपसंबंधाची स्थिती देखील कळेल. करण जोहरने अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांच्या अफेअरला दुजोरा दिला. मात्र, अनन्या याची पुष्टी करण्यास टाळाटाळ करत होती. ईशान खट्टरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अनन्या पांडेची कार्तिक आर्यनसोबतची जवळीक वाढली होती. असंही कळतं. पण अनन्याने कार्तिकला चांगला मित्र म्हटलं आहे. करण जोहर अनन्याला आदित्य रॉय कपूरच्या नावाने देखील चिडवताना दिसला.


आदित्य आणि अनन्यामध्ये काहीतरी शिजत असल्याचंही करण जोहरने सूचित केलं. मात्र अनन्या कशाचीही खातरजमा करणं टाळत होती ही गोष्ट वेगळी. अनन्याने शोमध्ये अनेकदा सांगितलं की, ती सिंगल आहे आणि सिंगल राहून ती खूप आनंदी आहे. अनन्याला कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी प्रेम हे लपत नाहीच, आदित्यसोबतच्या नात्याचं सत्य लवकरच चाहत्यांना कळेल.