अभिनेत्री अनन्या पांडेचं मोठं वक्तव्य म्हणाली, मला एक नव्हेतर करायची आहेत तीन लग्न
नेटफ्लिक्सच्या शो `फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज`च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या शोचा दुसरा सीझनही आला
मुंबई : सध्या नेटफ्लिक्सवर (Netflix) अनेक उत्तोमोत्तम वेब सिरिज आणि टिव्ही शोज हे येतेच असतात. अगदी लहान मुलांपासून ते गृहिणींपर्यंत तसेच अगदी वयस्कर लोकांपर्यंत सर्वचजण ओटीटीचे चाहते झाले आहेत. त्यातलाच एक शो सध्या सगळीकडेच धुमाकूळ घालतो आहे आणि तो म्हणजे 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज'. (Fabulous lives of Bollywood wives)
नेटफ्लिक्सच्या शो 'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज'च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि या शोचा दुसरा सीझनही आला ज्यामध्ये सीमा सजदेह, (Seema Sajdeh) महीप कपूर, (Maheep Kapoor), भावना पांडे (Bhavana Pandey) आणि नीलम कोठारी (Neelam Kothari) आहेत.
नेटफ्लिक्सवर 'फॅब्युलस लाइव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' सीझन 2 रिलीज झाला. यात महीप कपूर, नीलम कोठारी, भावना पांडे आणि सीमा सजदेह यांचं जीवन दाखवण्यात आलं आहे. यासोबतच या शोमध्ये त्यांची मुलंही वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चा करताना दिसली आहेत. मग ती भावनाची मुलगी अनन्या पांडे (Ananya Panday) असो किंवा महीपची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor) असो. त्यात शाहरुख खान आणि गौरी खान यांची सुंदर मुलगी सुहाना खान (Suhana Khan) असो.
अनन्या, सुहाना आणि शनाया या तिघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत कारण त्यांच्या आईही खूप छान मैत्रिणी. लोकप्रियतेच्या बाबतीतही तिघंही पुढे आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. अनन्याने यापूर्वीच बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. अलीकडेच ती साऊथ स्टार विजय देवरकोंडासोबत 'लिगर' चित्रपटात दिसली होती. सुहानाबद्दल सांगायचं झालं तर ती 'द आर्चीज' चित्रपटातून पदार्पण करण्याच्या तयारीत असून करण जोहरनेही शनायाला लॉन्च करण्याची जबाबदारी उचलली आहे.
अनन्याला करायचं आहेत अनेक लग्न
अनन्या, सुहाना आणि शनाया यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर त्याची झलक 'फेब्युलस लाईव्ह्स ऑफ बॉलीवूड वाइव्हज'च्या नवीन सीझनमध्ये पाहायला मिळाली आहे. एका एपिसोडमध्ये अनन्या आणि शनाया त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. अनन्याची लग्नाबद्दल खूप स्वप्नं आहेत आणि तिच्या लग्नात किती फंक्शन्स असतील हे देखील सांगितलं. तिला अनेक लग्न करायची आहेत.
हा शो सध्या सगळीकडे जोरदार व्हायरल झाला आहे. यातून बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांच्या पत्नींनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.