Ananya Panday On Ambani Wedding Dance : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिची वेब सीरिज 'कॉल मी बे' ला मिळालेल्या प्रतिसादामुळे चर्चेत आहे. ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'स्टूडंट ऑफ द इयर 2' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आता अनन्या स्वत: चं चित्रपटसृष्टीतील तिचं स्थान भक्कम करताना दिसते. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनंत आणि राधिकाच्या लग्नाविषयी असलेल्या अनेक अफवांवर पूर्ण विराम लावलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनन्या पांडेनं अनंतच्या वरातीत डान्स करण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला की सेलिब्रिटींना अंबानींच्या कार्यक्रमात डान्स करण्याचे पैसे मिळतात? यावर अनन्यानं उत्तर दिलं की 'तो माझा मित्र आहे. मला हेच कळत नाही की लोक असा का विचार करतात. ही अगदी साधारण गोष्ट आहे की मी माझ्या मित्राच्या लग्नात बेभान होऊन नाचेन. मला प्रेमाच्या उत्सवाला साजरा करायला आवडतं.' 


अनन्यानं अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या नात्यावर देखील वक्तव्य केलं. तिनं सांगितलं की 'लग्नाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप काही सुरु होतं, पण जेव्हा अनंत आणि राधिका एकमेकांना पाहायचे, तेव्हा त्यात प्रेस दिसून यायचं. असं वाटायचं की त्यांच्या मागे वायलिन वाजत आहे. हे काही असं आहे, जे मला आयुष्यात हवं आहे. चारही बाजुंना कितीही गोंधळ असला तरीही तुम्ही आणि ती व्यक्ती त्या नात्याला शेअर करता.'


अनन्या पांडेनं पुढे अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमाविषयी देखील सांगितलं. अनन्यानं सांगितलं की, 'त्यांनी सगळ्यांचे स्वागत केले. कितीही कार्यक्रम असू द्या, ते सगळे अगदी प्रेमानं आणि उत्साहानं स्वागत करतात. त्यांच्यात असलेला हा एक खूप सुंदर गुण आहे कारण ते या सगळ्याला खूप जवळच्या असल्याचं मानतात.'


अनन्या पांडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती नुकतीच 'कॉल मी बे' या सीरिजमध्ये दिसली. करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत ही सीरिज बनवण्यात आली होती. ही सीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली होती.