वडील चंकी पांडेचे चित्रपट पाहून `ट्रॉमेटाइज` व्हायची अनन्या पांडे? म्हणाली - मला भीती वाटायची
Ananya Panay and Chunky Panday : अनन्या पांडेनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Ananya Panay and Chunky Panday : 2019 मध्ये करण जोहरचा 'स्टूडंट ऑफ द इयर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. याच चित्रपटातून डेब्यू करणारी अनन्या पांडेनं तिच्या 5 वर्षांच्या करिअरमध्ये 10 पेक्षा जास्त चित्रपट केले. नुकतीच तिनं तिची पहिली सीरिज 'Call Me Bae' मधून ओटीटीवर पदार्पण केलं. अनन्या स्वत: एक स्टार किड आहे. अनन्या ही बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची लेक आहे. पण तुम्हाला माहितीये का लहान असताना तिला वडील चंकी पांडेचे चित्रपट पाहणं आवडत नव्हतं. अनन्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
अनन्यानं ही मुलाखत 'वी आर युवा' ला दिली होती. या मुलाखतीत अनन्यानं सांगितलं की तिच्या वडिलांचे अनेक चित्रपट पाहून ती 'ट्रॉमेटाइज' व्हायची आणि त्यामुळे तिनं त्याचे चित्रपट पाहणं बंद केलं होतं. अनन्यानं सांगितलं की "मी त्याचे चित्रपट जास्त पाहत नव्हते. कारण मला भीती वाटायची की चित्रपटात तुम्ही मराल. मला अजूनही आठवण आहे की जेव्हा मी 'D Company' पाहिली होती आणि अचानक तुम्हाला गोळी लागली आणि तुमचं निधन झालं गोतं. मला वाटलं की खरंच असं होतंय. महत्त्वाचं म्हणजे तेव्हा तुम्ही माझ्या जवळ बसले होते. त्यानंतर मी इतके घाबरले की मी नंतर तुमचे जास्त चित्रपट पाहिले नाही. कारण मला वाटायचं की तुम्ही प्रत्येक चित्रपटात मरणार आहात."
पुढे स्वत: च्या अभिनयातील करिअरविषयी बोलताना अनन्या म्हणाली की 'जेव्हा मी अभिनेत्री बनवण्याचं ठरवलं होतं तेव्हा मी तुमच्यासारखा विचार केला होता कारण जो चित्रपट मी पाहायचे त्यात जास्त मसाला असायचा आणि कमर्शियल असायचे. मला ते खूप आवडतात. मला माहित नव्हतं की आणखी बऱ्याच गोष्टी असतात. तर हे सगळं माझ्या रक्तात असावं. माझ्या पहिल्या चित्रपटांच्या आधी मला हे काहीच माहित नव्हतं की आपल्या भूमिकेतून आणखी काय वेगळं देऊ शकतो. 'गहराइयां' चित्रपटा दरम्यान, शाकुन बत्रानं मला अभिनयाविषयी विचार करण्यास भाग पाडलं आणि या सगळ्या प्रक्रियेत मला खूप मज्जा आली. त्यानंतर मला दोन्ही प्रकारचे चित्रपट करण्याची इच्छा झाली.
हेही वाचा : फुटबॉल मॅच पाहण्यासाठी पोहोचलं कपूर कुटुंब; रणबीरसोबत टीमला चीअर करताना दिसली राहा
दरम्यान, अनन्या पांडेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर विक्रमादित्य मोटवाने यांच्या 'CTRL' मध्ये तिनं महत्त्वाची भूमिका साकारली होती. लवकरच ती 'चांद मेरा दिल' या चित्रपटात दिसणार आहे.