मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan ) लाडका मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) आज 25 वा वाढदिवस आहे. (Aryank Khan's 25th Birthday) त्याला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अभिनेत्री अनन्या पांडेनेहमी (Ananya Pandey) सोशल मीडियावर आर्यनचा एक लहानपणीचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. आर्यन आणि अनन्या हे दोघे लहाणपनीचे मित्र आहेत ते दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. अनन्यानं कॉफी विथ करण मध्ये आर्यन तिचा क्रश असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये एका कार्यक्रमात आर्यन अनन्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.  त्यानंतर दोघांनामध्ये बिनसल्याचे म्हटले जात होते. आता अनन्यानं आर्यनला शुभेच्छा दिल्यानंतर सोशल मीडियावर तिनं दिलेल्या कॅप्शननं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेही वाचा : 'पैशांसाठी हिनं...', अभिनेत्री जुही चावला या कारणामुळे होतेय ट्रोल


अनन्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत: चा आणि आर्यनचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत 'मिसिंग बेबी आर्यन. माझ्या पहिल्या आणि सर्वात चांगल्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा', असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो शेअर करत अनन्यानं हार्ट इमोटीकॉन देखील वापरले आहे. या थ्रोबॅक फोटोत, अनन्या गुलाबी ड्रेसमध्ये दिसत आहे तर आर्यननं केशरी टी-शर्ट आणि पांढऱ्या पॅंट परिधान केली आहे. (Ananya Pandey wished Aryan Khan on his birthday shared a childhood picture and said my first and best friend) 


पाहा अनन्याची पोस्ट -


(Photo Credit : Ananya Pandey Instagram Story)

अनन्या सगळ्यात शेवटी विजय देवरकोंडा सोबत 'लायगर' या चित्रपटात दिसली होती. 'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडमध्ये दोघे एकत्र दिसले होते. त्यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. अनन्या 'खो गये हम कहाँ' या तिच्या आगामी चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत दिसणार आहे. याशिवाय ती आयुष्मान खुरानासोबत 'ड्रीम गर्ल 2' मध्येही दिसणार आहे.