मुंबई : दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर चित्रपट 'गेहराईया' हा सिनेमा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. या चित्रपटात दीपिका लग्नानंतर पहिल्यांदाच अधिक बोल्ड होताना दिसणार आहे.  या चित्रपटाचं प्रमोशनही कलाकारांनी सुरू केलं आहे. पण प्रमोशन करताना अनन्या पांडेने सगळी लाईमलाईट लुटली आणि तिचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनन्याचा छोटा ड्रेस
अनन्या पांडेने 'गेहराईया' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी इतका छोटा ड्रेस परिधान केला होता की, तिला चालणं कठीण झालं होतं. पायर्‍या उतरतानाही तिला विचित्र पद्धतीने ड्रेस पकडावा लागला जेणेकरून ती  oops moment ला बळी पडली. या मिनी ड्रेसमध्ये अनन्या पांडे खूपच सुंदर दिसत होती. पण हे सौंदर्य तिला पुन्हा-पुन्हा त्रास देत होतं. पण अनन्याला तिच्या आउटफिटमुळे ट्रोल होण्याची ही कीही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती अनेकदा शॉर्ट ड्रेस परिधान केल्यामुळे चर्चेत आली होती.


लाल ड्रेसपूर्वी चर्चेत येण्याआधी अनन्याने क्रॉप टॉप आणि ट्राउझर्स घातली होती. असं दिसतं की, अभिनेत्रीला इतकी थंडी वाजणार याची कल्पना नव्हती, म्हणूनच वारा येताच ती थरथर कापू लागली. या व्हिडीओमध्ये अनन्या पांडेने क्रीम रंगाची पायघोळ पॅन्ट घातली होती.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यासोबत तिने ब्राउन कलरचा ब्रॅलेट घातला होता.  अभिनेत्री अचानक थंडीने थरथर कापू लागली. त्यानंतर तिचा को-स्टार सिद्धांत चतुर्वेदीने तिचं जॅकेट काढलं आणि ते अनन्याला घातलं. व्हिडिओमध्ये सिद्धांतने अनन्याचं जॅकेट घालताच तिला थंडीपासून थोडा आराम मिळाला. यानंतर अनन्याने मीडियासमोर सिद्धांतसोबत पोज दिली.